ठाणे ग्रामीण जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडची रायफल/पिस्तूल शुटींग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी अंबरनाथ रायफल शुटींग क्लब येथ आयोजित ग्रामीण जिल्हास्तरीय रायफल / पिस्तूल शुटींग स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या (वयोगट १४, १७ व १९ वर्षांखालील संघामधून) सहभागी झालेल्या कॅडेट हर्ष बंदरकर, कॅडेट स्वरुप संते, कॅडेट चिन्मय परब, कॅडेट यज्ञेश वाघ या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन सुवर्ण पदक प्राप्त केले, तर कॅडेट यश नायर, कॅडेट भुमिल भूरे, कॅडेट आयर्न गोळे या विद्यार्थ्यांनी सिल्वर पदक मिळवून, विभागस्तरीय स्पर्धासाठी या सर्व विद्यार्थ्याची निवड करण्यात आलेली आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्तापित

१५ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा क्रिडाधिकारी ठाणे यांनी अंबरनाथ रायफल शुटींग क्लब येथ आयोजित ग्रामीण जिल्हास्तरीय रायफल / पिस्तूल शुटींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामधून सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा जिल्हास्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यासाठी स्कुलचे रायफल व पिस्तुल या खेळाचे प्रशिक्षक संदेश गपाट यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करुन घेतली होती. महाराष्ट्र मिलटरी स्कूल मुरबाडच्या संघाने मिळविलेल्या यशाबद्दल या शाळेचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सुर्यकांतजी पाटील कार्यवाह रणजित सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर, हॉकी प्रशिक्षक राजेंद्र तिवारी सर्व क्रिडा विभागातील प्रशिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

(हेही वाचा राहुल गांधीच माफीवीर, माफीनाम्यांची जंत्रीच सोशल मीडियात व्हायरल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here