ठाणे बॉक्सिंग असोसिएशन यांच्याकडून ठाणे येथील ब्रुट बॉक्सिंग क्लब मानपाडा येथे 26 सप्टेंबर रोजी बॉक्सिंग (Boxing) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा जिल्हास्तरीय स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. यासाठी महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षक दिपेश धाडवे, संदेश गपाट यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करुन घेतली होती. महाराष्ट्र मिलटरी स्कूल मुरबाडच्या संघाने मिळविलेल्या यशाबद्दल या शाळेचे विविध स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सुर्यकांतजी पाटील, कार्यवाह रणजित सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर, तसेच सर्व क्रिडा विभागातील प्रशिक्षक, सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे. ठाणे बॉक्सिंग (Boxing) असोसिएशन आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या वयोगट 14, 17 वर्षांखालील संघामधून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन 2 सुवर्ण आणि 3 सिल्वर अशी 5 पदके प्राप्त केली.
14 वर्षांखालील मुले
- मोनिष तेलंगे, 50 किलो वजन गट (सुवर्ण)
- श्रीकांत मोपगर, 52 किलो वजन गट (सुवर्ण)
- हर्षवर्धन मोरे, 46 किलो वजन गट (रजत)
- ध्रुव प्रजापती, 43 किलो वजन गट (रजत)
12 वर्षांखालील मुले
- ओमकार अवटे, 30 किलो वजन गट (रजत)