महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; कोल्हापुरातल्या या जलतरणपटूंना ‘अर्जुन पुरस्कार’

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्निल पाटीलने अर्जुन पुरस्कारावर मोहोर उमटलवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोल्हापूर कुस्तीसह, नेमबाजी आणि जलतरणामध्ये मोठी परंपरा आहे. स्वप्नीलला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला.

पॅरालिम्पिमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. राज्य सरकारनेही त्याचा गौरव केला असून, शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कारामुळे आनंद द्विगुणित 

कोल्हापूर जिल्ह्यातून जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, गणपतराव आंदळकर, शैलजा साळोखे हे अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. दरम्यान, वडील संजय पाटील हेच स्वप्नीलचे जलतरण प्रशिक्षक असल्याने पुरस्कारामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील 2006 पासून जलतरण करत आहे.

( हेही वाचा: खडसेंना धक्का; जळगाव दूध संघातल्या अपहारप्रकरणी पहिली अटक )

स्वप्निल पाटीलने पटकावलेली पदके

शालेय जीवनापासूनच तो जलतरण करत आहे. 2008 मध्ये त्याने राष्ट्रीय पातळीवर दोन कांस्यपदके भारतीय संघाचे लक्ष वेधले. त्यामुळे त्याला 2011 मध्ये भारतीय संघाचे दरवाजे उघडले. भारतीय संघात निवड होताच त्याने अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत चार सुवर्णपदक जिंकत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर 2014 मध्ये दक्षिण कोरियातील आशियाई गेम्समध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत एक रौप्य व दोन कांस्यपदक जिंकले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here