Maharashtra State Kho Kho Championship : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक 

Maharashtra State Kho Kho Championship : खो खो लीगमधील मुंबई खिलाडीज् संघाचे मालक पुनीत बालन यांनी तशी घोषणा केली होती

158
Maharashtra State Kho Kho Championship : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक 
Maharashtra State Kho Kho Championship : राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना इलेक्ट्रिक बाईक 
  • ऋजुता लुकतुके

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन (Maharashtra State Kho Kho Championship) व रायगड जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा नुकत्या पार पडल्या. या स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू अश्विनी शिंदे (Ashwini Shinde) (धाराशिव) (मुली गट)  व  रूपेश कोंडाळकर (Rupesh Kondalkar) (ठाणे)( कुमार गट) या खेळाडूंना स्पर्धेनंतर इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून मिळाल्या. (Maharashtra State Kho Kho Championship)

(हेही वाचा- Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर)

अल्टिमेट खोख लीगमधील मुंबई खिलाडीज संघाचे मालक आणि पुनीत बालन समुहाचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी ही स्पर्धा सुरू असतानाच सर्वोत्तम खेळाडूंना इलेक्ट्रिक स्कूटर देण्याची धोषणा केली होती. ती त्यांनी पाळली. अलीकडेच बालन यांच्या पुण्यातील कार्यालयात अश्विनी शिंदे आणि रुपेश कोंडाळकर यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. आणि दोघांनाही अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर भेट देण्यात आली. सत्कार अर्थातच पुनील बालन यांच्या हस्ते पार पडवा. या  एका इलेट्रिक बाईक ची किंमत १ लाख २९ हजार असून अशा दोन इलेट्रिक बाईक देण्यात आल्या. पुनीत बालन यांच्याबरोबरच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार अनिकेत तटकरे यावेळी उपस्थित होते. (Maharashtra State Kho Kho Championship)

(हेही वाचा- Rakhaldas Banerjee : मोहेंजोदडो संस्कृतीचा शोध घेणारे भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ राखालदास बॅनर्जी)

या प्रसंगी भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, (Chandrajit Jadhav) महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार श्री. गोविंद शर्मा, (Govind Sharma) धाराशिव जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव श्री. प्रविण बागल, (Pravin Bagal) छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव श्री. विकास सूर्यवंशी तसेच खेळाडूंचे पालक उपस्थित होते. (Maharashtra State Kho Kho Championship)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.