Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?

Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोनं याविषयी फॅक्ट चेक केलं आहे.

52
Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?
  • ऋजुता लुकतुके

अलीकडे सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतात ७ क्रमांकाची क्रिकेट जर्सी लोकप्रिय केली. या जर्सीचा आणि पर्यायाने धोनीचा गौरव म्हणून रिझर्व्ह बँक देशात सात रुपयाचं नाणं काढणार असल्याची ही बातमी होती. आरबीकडून एमएस धोनीच्या सन्मानासाठी ७ रुपयांचं नाणं जारी केलं जाईल, असा दावा केला जात होता. पण, केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण सेवेकडूनच आता या बातमीची पोल खोल करण्यात आली आहे. फॅक्ट चेक करून त्यांनी या बातमीची सत्यता कशी तपासली आहे ती पाहा.

(हेही वाचा – Madrasa मध्ये बिलाल अहमदचा तरुणीवर बलात्कार, पीडितेला दिली जीवे मारण्याची धमकी)

पीआईबी फॅक्ट चेकमध्ये एमएस धोनीबाबत केल्या जाणाऱ्या दाव्यातील तथ्य समोर आलं. आरबीआयकडून असं कोणत्याही प्रकारचं नाणं जारी केलं जाणार नाही. याबाबत डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेर्सनं देखील धोनीच्या नावानं काढल्या जाणाऱ्या दाव्याबाबत कोणतीही पोस्ट केलेली नाही. “सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन पसरवला जात आहे, त्यात महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेटमधील महान कामगिरीच्या सन्मानार्थ ७ रुपयांचं नाणं नवं जारी केलं जाणार आहे.” फोटोत केला जाणारा दावा चुकीचा आहे. डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेअर्सचा दावा खोटा आहे.

(हेही वाचा – Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…)

देशाच्या वित्त मंत्रालयादेखील भ्रम पसरवल्या जाणाऱ्या पोस्ट संदर्भातील माहिती मिळाली होती. वित्त मंत्रालयानं तातडीनं याबाबत यावर कारवाई करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरण देणारी पोस्ट केली आहे. पीआयबी फॅक्ट चेकनं ती पोस्ट रिपोस्ट केली आहे. यानंतर आरबीआयकडून किंवा डिपार्टमेंट ऑफ इकोनॉमिक्स अफेअर्सनं नवं नाणं जारी केलं जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

(हेही वाचा – ‘… म्हणून अशोक चव्हाण आमच्याकडे आले’, CM Eknath Shinde यांनी केला खुलासा)

दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघानं आयसीसीच्या तीन स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं होतं. भारतीय क्रिकेट संघानं २००७ चा टी २० विश्वचषक, २०११ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ च्या चॅम्पियन्स चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच विजेतेपद भारतानं मिळवलं. याशिवाय धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्जनं अनेकदा आयपीएलचं विजेतेपद मिळवलं आहे. धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. २०२५ च्या आयपीएलमध्ये देखील तो खेळताना पाहायला मिळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.