Mahendra Singh Dhoni : महेंद्र सिंग धोनी पुढील आयपीएल खेळणार की नाही, स्वत:च दिलं उत्तर

Mahendra Singh Dhoni : आयपीएल लिलावापूर्वी धोनीने आपल्या भवितव्याविषयी महत्त्वाचं विधान केलं आहे. 

95
Mahendra Singh Dhoni 7 Rupee Coin : महेंद्रसिंग धोनीच्या नावाने ७ रुपयांचं नाणं खरंच बाजारात येणार का?
  • ऋजुता लुकतुके

महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचे चाहते आजही कमी झालेले नाहीत. निदान आयपीएलमध्ये त्याचं दर्शन व्हावं अशी अपेक्षा बाळगून असतात. अशा चाहत्यांसाठी खुद्द धोनीने आपल्या कारकीर्दीविषयी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आयपीएलचा लिलाव नोव्हेंबर महिन्यात होणार आहे आणि त्यापूर्वी महेंद्र धोनीविषयी खूप काही बोललं जात आहे. चेन्नई संघ त्याला कायम ठेवणार का? ठेवलं तर अननुभवी खेळाडूचा दर्जा देत ठेवणार की, मानाने ठेवणार अशा अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

आणि त्याचवेळी खुद्द धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या भवितव्याविषयी एका खाजगी कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. क्रिकेटमध्ये उरलेली काही वर्षं मजेत धालवायची आहेत, असं तो म्हणतो. याचाच अर्थ पुढील हंगामात त्याला खेळायचंय. ‘क्रिकेटमध्ये माझी जी काही शेवटची वर्षं बाकी असतील ती मला मजेत घालवायची आहेत. लहान होतो तेव्हा ४ वाजता पहाटे सामने खेळलेलो आहोत. तेव्हा खूप मजेत असायचो. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू झालं आणि मजा संपली, जबाबदारी सुरू झाली. आता उर्वरित क्रिकेट मला मजेसाठी खेळायचंय,’ असं धोनी म्हणाला.

(हेही वाचा – Vijaykumar Vyshak : भारतीय संघात विजयकुमार व्यक्ष, रमणदीप हे नवीन चेहरे)

४३ वर्षीय धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) आयपीएलमधील भवितव्यावर जोरदार चर्चा सुरू असताना त्यानेच हे विधान केलं आहे. गेल्या हंगामात चेन्नई फ्रँचाईजीने धोनीकडून नेतृत्व काढून घेत ते ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. नवीन फळीला तयार करणं हेच त्या मागील कारण होतं. धोनी गुडघ्याच्या दुखापतीमुळे अख्खा हंगाम खेळला नाही. पण, तो नियमितपणे संघात होता. आता त्याला संघात कायम ठेवण्यासाठी चेन्नई संघाकडे दोन पर्याय आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यामुळे अनुभवी खेळाडूच्या श्रेणीतून त्याला कायम ठेवायचं आणि त्यासाठी त्याला ४ कोटी रुपये द्यायचे. किंवा महत्त्वाचा खेळाडू म्हणून कायम ठेवल्यास त्याला १४ किंवा १० कोटी द्यावे लागतील.

धोनी (Mahendra Singh Dhoni) पहिल्या पर्यायासाठी तयार झाल्यास चेन्नईला कमी पैशात धोनी सारख्या खेळाडूला ठेवता येईल. पण, धोनीने आयपीएल खेळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे हे नक्की. कारण, पुढे तो म्हणतो, ‘आयपीएल खेळायचं म्हणजे अडीच महिन्यांसाठी स्वत:ला तंदुरुस्त ठेवावं लागेल. त्यासाठीच पुढील नऊ महिने मी मेहनत घेणार आहे. ते शक्य झालं तर मला नक्कीच खेळता येईल.’ खेळाडूंचा मेगा लिलाव नोव्हेंबर महिन्यात होणार आहे आणि त्यापूर्वी आयपीएलमधील १० संघ मालकांना त्यांना कायम ठेवायचे असलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत द्यायची आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.