फिफाने ( International Federation of Association Football) अखिल भारतीय फुटबाॅल फेडरेशनवर मोठी कारवाई केली आहे. फिफाने भारतीय फुटबाॅल फेडरेशला तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. त्याशिवाय, ऑक्टोबर महिन्यात होणा-या 17 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले आहे. तिस-या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे.
फिफाने दिलेल्या माहितीनुसार, फिफाच्या कार्यकारणीने सर्वसंमतीने भारतीय फुटबाॅल फेडरेशनला अनुचित हस्तक्षेप मुद्द्यावर निलंबित करण्याचा निर्णय घेतला. फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने, ही कारवाई करण्यात आली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
( हेही वाचा: भारतीय पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! परीक्षेविना केली जाणार निवड )
…तर निलंबनाची कारवाई मागे घेणार
फिफाने म्हटले आहे की, अखिल भारतीय फुटबाॅल फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकरण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर आणि फुटबाॅल फेडरेशनकडे संपूर्ण अधिकार आल्यानंतर, ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येणार असल्याचे फिफाने स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community