-
ऋजुता लुकतुके
२०२४ च्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आणि त्यानंतर लगेचच म्हणजे आणखी १०० दिवसांत अमेरिकेत मेजर लीग (Major League Cricket) क्रिकेटचा दुसरा हंगामही सुरू होणार आहे. अमेरिका क्रिकेटच्या रंगात न्हावून निघाल्याचं चित्र यंदा बघायला मिळतंय.
रशिद खान, फाफ दू प्लेसिस, एडन मार्करम, मार्को जानसन, क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यंदाही या लीगमध्ये दिसणार आहेत. पहिल्या हंगामाला मिळालेल्या यशानंतर आता मेजर लीग स्पर्धा (Major League Cricket) दुसऱ्या हंगामासाठी सज्ज आहे. आधीचेच सहा संघ यंदाही दिसणार आहेत. गेल्यावर्षी नॉर्थ कॅरोलायना आणि टेक्सासमधील लीगचे सामने हे शंभर टक्के गर्दीचे गेले होते.
(हेही वाचा – IND – PAK Cricket : क्रिकेट ऑस्ट्रेलियाला भरवायचीय भारत – पाक मालिका)
तसंच यश या हंगामातही लीगला अपेक्षित आहे. एमआय न्यूयॉर्क, टेक्सास सुपर किंग्ज, वॉशिंग्टन फ्रीडम, सियाटल ऑरकाज्, सॅनफ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि एलए नाईटरायडर्स असे सहा संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या हंगामात न्यूटॉर्क फ्रँचाईजीने सियाटल ऑरकाज् चा पराभव करत लीगचं विजेतेपद पटकावलं होतं. १ जून ते २९ जून पर्यंत यंदा टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आणि ती संपल्यावर दोनच दिवसांत मेजर लीग क्रिकेट सुरू होईल. (Major League Cricket)
गेल्यावर्षीच्या लीगमुळे अमेरिकेत क्रिकेटचा चांगला प्रसार झाल्याचं बोललं जातंय. आणि २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाच्या निर्णयालाही मजबुती मिळाली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community