चिंचपोकळीत रंगणार ‘मल्लखांब’ थरार…कोण ठरणार यशवंत चषकाचे मानकरी?

107

महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना व मुंबई शहर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मान्यतेने “यशवंत चषक’” निमंत्रित राज्यस्तरीय रोप मल्लखांब/ मल्लखांब स्पर्धा शनिवार, ११ व रविवार १२ डिसेंबर २०२१, या कालावधीत चिंचपोकळी येथील सुरेश आचरेकर क्रिडांगण येथे “ऋतुराज स्पोर्ट्स अकॅडमी” यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अनेक नामांकित संस्थांच्या पुरुष व महिला संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

मल्लखांब प्रेमी होणार सहभागी 

या स्पर्धेत सुमारे ३०० खेळाडूंचा सहभाग असून शनिवार ११ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्पर्धेला सुरूवात होणार आहे. याचबरोबर पहिल्यांदाच एक आकर्षक अशी प्रदर्शनीय स्पर्धा ३० वर्षांवरील मल्लखांब प्रेमींसाठी आयोजित करण्यात आली असून माजी मल्लखांबपटू व इतर मल्लखांब प्रेमी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

हे असतील उपस्थितीत

विजेत्या खेळाडूंना आयोजकांतर्फे आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भायखळा विधानसभा आमदार यामिनी यशवंत जाधव यांच्या शुभहस्ते होणार असून, तद्प्रसंगी सिनेट सदस्य युवासेनेचे निखील यशवंत जाधव, भायखळा विधानसभा संघटक विजय लिपारे, उमेश सिताराम नाईक, अध्यक्ष – चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती ऋतुराज स्पोर्टस अकॅडमीचे सचिव ऋतुराज शिरोडकर यांनी दिली आहे.

 ( हेही वाचा: बिपीन रावत यांच्या मृत्यूवर चीनने ओकली गरळ! भारतीय सैन्याविषयी म्हणाला… )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.