Man City Fined : ईपीएल मध्येही खेळाडूंची हुल्लडबाजी, मॅन्चेस्टर सिटीला दीड लाख डॉलरचा मोठा दंड 

मॅनसिटी आणि टॉटनहॅम हॉटस्पर दरम्यानच्या सामन्यात सिटीच्या खेळाडूंनी रेफरींना घेराव घातला होता 

176
Man City  Fined : ईपीएल मध्येही खेळाडूंची हुल्लडबाजी, मॅन्चेस्टर सिटीला दीड लाख डॉलरचा मोठा दंड 
Man City  Fined : ईपीएल मध्येही खेळाडूंची हुल्लडबाजी, मॅन्चेस्टर सिटीला दीड लाख डॉलरचा मोठा दंड 

ऋजुता लुकतुके

मँचेस्टर सिटी संघाला (Man City  Fined) मंगळवारी १,२०,००० पाऊंडांचा जबर दंड करण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला टॉटनहॅम हॉटस्पर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात सिटीच्या खेळाडूंनी रेफरी सायमन हूपर यांना घेराव घातला होता. मैदानात हुल्लडबाजी केली होती. त्यासाठी संघावर ही कारवाई करण्यात आली आहे.

अर्लिंग हॅलंडने रचलेल्या एका चालीला टॉटनहॅमच्या इमर्सन रॉयलने अडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचं टायमिंग थोडसं चुकलं. चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये झटापट सुरू असताना रेफरी हूपर यांनी खेळ थांबवून नवीन सुरुवात करण्याचा इशारा दिला. पण, मॅन सिटीच्या खेळाडूंच्या मते त्यांना ताबा मिळवण्याची आणि आगेकूच करण्याची चांगली संधी होती. पण, रेफरींमुळे फ्री किक हुकली, असा मॅन सिटीचा दावा होता. त्यामुळे रेफरींच्या निर्णयाचा निषेध करत खेळाडूंनी सायमन हूपर यांना घेराव घातला होता.

या सामन्यात ३-३ अशी बरोबरी असताना ही घटना घडली. त्यामुळे मॅन सिटीच्या खेळाडूंची भावना विजयाची संधी हुकली अशी होती. प्रमुख खेळाडू हॅलंडने सामन्या नंतरही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण, आता फुटबॉल संघटनेनंच मॅन्चेस्टर सिटी खेळाडूंचं वागणं खिलाडूवृत्तीला धरून नव्हतं असा निर्वाळा दिला आहे. आणि त्यांच्यावर त्या घटनेसाठी १,२०,००० पाऊंडांचा दंड ठोठावला आहे.

ती घटना घडल्यानंतर नेमलेल्या चौकशी समितीसमोर मॅन सिटी संघानेही (Man City  Fined) खेळाडूंच्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. आणि त्याचं वागणं अयोग्य असल्याचं मान्य केलं होतं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.