Manchester City Wins EPL : मॅन्चेस्टर सिटीने सलग चौथ्यांदा जिंकली प्रिमिअर लीग

Manchester City Wins EPL : रविवारी वेस्ट हॅमवर त्यांनी ३-१ ने विजय मिळवला.

185
Manchester City Wins EPL : मॅन्चेस्टर सिटीने सलग चौथ्यांदा जिंकली प्रिमिअर लीग
  • ऋजुता लुकतुके

मॅन्चेस्टर सिटी संघाने इंग्लिश प्रिमिअर लीग या मानाच्या फुटबॉल लीगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना सलग चौथं विजेतेपद पटकावलं आहे. पेप गॉर्डिएला यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने मागच्या ७ वर्षांत सहावं विजेतेपद पटकावलं आहे. या हंगामात खरंतर आर्सेनल फ्रँचाईजीने लीगमध्ये स्पर्धा निर्माण केली होती. आणि मॅनसिटीला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं होतं. पण, लीगच्या शेवटच्या टप्प्यात सलग ९ सामने जिंकून मॅनसिटीने विजेतेपद खेचून आणलं. या टप्प्यात त्यांनी ३३ गोलही केले. (Manchester City Wins EPL)

रविवारी वेस्ट हॅमविरुद्ध त्यांनी ३-१ ने विजय मिळवला आणि या विजयाचा शिल्पकारही इन-फॉर्म स्ट्रायकर फिल फोडेन होता. सामन्याच्या ७९ व्या मिनिटाला त्याने मारलेला फटका तीरासारखा गोल जाळ्यात घुसला. या देखण्या गोलनंतर मध्यंतराला काही वेळ असताना त्याने आणखी एक गोल केला. आणि सामन्यावर मॅनसिटीचं वर्चस्व तयार झालं. (Manchester City Wins EPL)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ओडिशात १० जूनला भाजपचे डबल इंजिन सरकार बनणार; PM Narendra Modi यांचा दावा)

फोडेनच्या दुसऱ्या गोलनंतर काही काळ वेस्ट हॅमचं आक्रमणही जोरात होतं आणि त्यांच्या मोहम्मद कुडुसने मध्यंतराची वेळ संपता संपता वेस्ट हॅमसाठी एक गोल केला. पण, तरीही त्यांच्या खेळात सुसुत्रता नव्हती. उलट मॅनसिटी संघ विजेत्यासारखाच मैदानात वावरत होता आणि त्यांनी रचलेल्या चालीही सुसंबंध होत्या. दुसऱ्या हाफमध्ये लगेचच एक गोल करत सिटीने आपली विजयी आगेकूच कायम ठेवली. (Manchester City Wins EPL)

या सामन्यात त्यांचा मुख्य खेळाडू अर्लिंग हेलँड फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याचे गोलचे प्रयत्न वाया गेले. पण, एकूण स्पर्धेत २९ सामन्यांत २५ गोल करत त्यानेच गोल्डन बूट आपल्या नावावर केला. सलग दुसऱ्यांदा हेलँडने हा मान पटकावला आहे. या सामन्यानंतर प्रेक्षकांमध्ये मात्र काहीशी हुल्लडबाजी झाली. मॅनसिटीने विजय मिळवल्यावर शेकडो चाहते थेट मैदानातच घुसले. त्यामुळे काही वेळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. (Manchester City Wins EPL)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.