खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे सुयश

131

इंदूर मध्य प्रदेश येथे सुरु असलेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेची सुरुवात 40 किलो वजनी गटात वीणाताई संतोष आहेरने सुवर्णपदक मिळवले, 57 किलो स्न्याच 72 किलो क्लीन जर्क असे 129 किलो वजन उचलून वीणाताई आहेर हिने नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 45 किलो वजनी गटात 67 किलो स्न्याच 77 किलो क्लीन जर्क एकूण 144 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. वीणाताई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तर आकांक्षा श्री गुरु गोबिंद सिंग हायस्कूलच्या विद्यार्थिनी आहेत.

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी.जी. धारवाडकर, अध्यक्ष पी.जे. दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर.एन. थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, पर्यवेक्षिका पोतदार एस. एस.के.आर.टी विद्यालयाचे प्राचार्य मुकेश मिसर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, श्री गुरु गोविंद सिंग हायस्कुलचे अध्यक्ष बाबा रणजित सिंहजी, प्राचार्य सदाशिव सुतार, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने, सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले.

(हेही वाचा तुर्कीतील भूकंपाबाबत ३ दिवसांपूर्वीच मिळालेले पूर्वसंकेत; ट्विट होतेय व्हायरल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.