Manu Bhaker Bronze : मनु भाकरचं पंतप्रधान मोदींनी केलं फोनवरून अभिनंदन, हरयाणाच्या घरात दिवाळी साजरी

मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकून भारतासाठी पदकांचं खातं उघडलं आहे.

99
Manu Bhaker Bronze : मनु भाकरचं पंतप्रधान मोदींनी केलं फोनवरून अभिनंदन, हरयाणाच्या घरात दिवाळी साजरी
Manu Bhaker Bronze : मनु भाकरचं पंतप्रधान मोदींनी केलं फोनवरून अभिनंदन, हरयाणाच्या घरात दिवाळी साजरी
  • ऋजुता लुकतुके

रविवारी नेमबाज मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मनुला पॅरिसला फोन करत तिचं अभिनंदन केलं. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनुने २२१.८ गुण कमावत कांस्य आपल्या नावावर केलं. नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. त्यानंतर तिच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनीही मनूला व्हीडिओ कॉल करून तिच्याशी संवाद साधला. (Manu Bhaker Bronze)

(हेही वाचा – Ind vs SL, 2nd T20 : पावसाने व्यत्यय आणलेला सामना जिंकत भारताची मालिकेत २-० ने विजयी आघाडी)

‘तुझं हार्दिक अभिनंदन. तुझ्या पदकाची बातमी ऐकल्यापासून माझी छाती अभिमानाने भरून आली आहे. केवळ ०.१ गुणांनी तुझं रौप्य पदक हुकलं. या ऑलिम्पिकमध्ये तू देशासाठी पहिलं पदक जिंकलं आहेत. विशेष म्हणजे टोकयोतील अपयश मागे टाकून तू हे यश खेचून आणलंस. त्यासाठी तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे,’ असं पंतप्रधान या संवादा दरम्यान म्हणाले. (PM Narendra Modi) त्यानंतर मोदींनी मनुला पॅरिसमधील सुविधा पुरेशा आणि योग्य आहेत का, असाही प्रश्न विचारला. आणि ‘तुझं तुझे पालक आणि मित्र परिवाराशी बोलणं झालं का,’ असंही पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) विचारलं. (Manu Bhaker Bronze)

हरयाणात झज्जर इथं मनुच्या घरी विजयोत्सव सुरू होताच. ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती देशातील पहिली महिला ठरलीय. घरात मिठाई वाटून सगळ्यांनी आनंद साजरा केला. तर घराला दिवाळी सारख्या सणाचं स्वरुप आलं होतं. अभिनंदनाचे फोन सुरू होते.

(हेही वाचा – Amrapali Mango झाड कसे वाढवावे?)

‘टोकयोत तिची पिस्तुल बंद पडली होती. त्यामुळे तिला स्पर्धा अर्धवट सोडावी लागली. ती गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती. म्हणूनच तिने पॅरिससाठी जास्त तयारी केली,’ असं मनुची आई सुमेधा भाकर यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. मनु आणखी दोन प्रकारांमध्ये सोमवार आणि मंगळवारी खेळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.