Manu Bhaker Returns :  दुहेरी पदक विजेती मनु भाकर भारतात परतली

Manu Bhaker Returns : मनू भाकेरचं दिल्लीत जोरदार स्वागत झालं, तिची मिरवणूकही निघाली

105
Manu Bhaker : ‘लॉस एंजलीसमध्ये पदकांचा रंग बदलण्याचा निर्धार, सराव सुरू’
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) दुहेरी पदक जिंकणारी नेमबाज मनु भाकर (Manu Bhaker Returns) बुधवारी भारतात परतली. तिच्याबरोबर तिचे प्रशिक्षक जसपाल राणाही होते. दोघांचं दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मनुने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफलची मिश्र सांघिक लढत अशा दोन प्रकारात कांस्य पदक जिंकलं. एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदकं जिंकणारी मनु पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. त्यानंतर २५ मीटर रॅपिड पिस्तुल प्रकारातही मनुचं कांस्य पदक थोडक्यात हुकलं. ती चौथी आली.

(हेही वाचा- Birla Mandir : तुम्हाला माहित आहे का, बिर्ला मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे?)

पॅरिसमध्ये दोन पदकं मिळाली असली तरी मनु इतक्यात थांबलेली नाही. २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकची तयारी सुरू केल्याचं तिने जाहीर केलं आहे. मनूने दिल्लीत उतरल्या उतरल्या आपली आई आणि वडिलांना मिठी मारली. मनु रविवारच्या ऑलिम्पिक समारोपाच्या कार्यक्रमासाठी पॅरिसला परत जाणार आहे. (Manu Bhaker Returns)

मनुच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर गर्दी जमली होती. ढोल ताशांच्या गजरात तिचं स्वागत करण्यात आलं. मनुनेही विमानतळाबाहेर येताच पदक उंचवून चाहत्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला. (Manu Bhaker Returns)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.