Manu Bhaker म्हणाली, भगवद्‍गीतेमधील शिकवण माझा आदर्श

मनू भाकरची (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये कांस्‍य पदकाला गवसणी घातली.

221
Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!
Manu Bhaker : भगवद्गीता विरूद्ध आतंकवाद!

मी दररोज भगवद्‍गीतेचे वाचन करते. तुम्‍ही फक्‍त कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करु नका, असे भगवान कृष्‍णांची शिकवण आहे. भगवद्‍गीतेमधील शिकवण माझा आदर्श आहे. यश तुमच्‍या हातात नाही. तुम्‍ही फक्‍त प्रयत्‍न करायचे असतात. याच शिकवणीतून मी फळाची कोणतीही अपेक्षा न करता नेमबाजीत माझा सराव कायम ठेवला. आज मला त्‍याचे फळ मिळाले. देशवासीयांच्‍या पाठिंबा आणि कुटुंबीयांच्‍या प्रोत्‍साहानामुळेच मला हे यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया पॅरीस ऑलिम्‍पिकमध्‍ये कांस्‍य पदकावर मोहर उमटिवणार्‍या मनू भाकर (Manu Bhaker) हिने दिली.

(हेही वाचा Paris Olympic 2024 : भारताने पहिले पदक जिंकले; मनू भाकरला नेमबाजीत कांस्यपदक)

कांस्‍य पदकावर आपली माेहर उमटवली

मनू भाकरची (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्‍पिकमध्‍ये कांस्‍य पदकाला गवसणी घातली. भारताची युवा नेमबाज मनू भाकरने २८ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये इतिहास घडवला. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात तिने कांस्‍य पदकावर आपली माेहर उमटवली आहे. ऑलिम्‍पिकमध्‍ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात मनू भाकरने अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता स्‍पर्धेत तिने 580-27 गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. अंतिम सामन्‍यात सुरुवातीपासून तिने अचूक लक्ष्‍य साधले. आज तिच्‍या कामगिरीत अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण दिसून आले. पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावले. तिसर्‍या राउंडमध्‍ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3अंकांसह मनू तिसर्‍या स्‍थानवर राहिली. फायनलमध्ये 20 शॉट्सनंतर, मनू भाकरने (Manu Bhaker) २०१.३ गुण मिळवत पदक निश्चित केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.