-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात एकेरी आणि मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदकं जिंकून मनु भाकरने (Manu Bhaker) इतिहास रचला. आणि अजून तिचे सत्कार समारंभ देशभर सुरू आहेत. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. आपल्या या यशाचं श्रेय मात्र मनुने आपली आई आणि आपल्या प्रशिक्षकांना दिलं आहे. जसपाल राणा (Jaspal Rana) यांच्याबरोबर मनु सराव करते. आणि कानपूरमध्ये टाईम्स वृत्तसमुहाने आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना, ‘राणा यांनी आपल्याला नेमबाज म्हणून धडवलं आहे,’ असं मनु (Manu Bhaker) म्हणाली. त्याचबरोबर आईने जसं वाढवलं, त्यामुळे आपल्याला जिंकण्याची प्रेरणा मिळाली, असं सांगायलाही ती विसरली नाही.
‘माझ्या आईकडून मला आत्मविश्वास मिळतो. आणि राणासरांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे. राणासर शिस्तप्रिय आहेत. कडक आहेत. पण, माझ्या कारकीर्दीला वळण त्यांनी लावलंय. तर आईने मला जिद्द आणि उमेद दिली आहे. आव्हानं सगळ्यांना येतात. आणि प्रत्येकाची एक कहाणी असते. पण, माझ्या कहाणीत मला सगळ्यात जास्त प्रभावित या दोघांनी केलं आहे,’ असं मनु (Manu Bhaker) यावेळी म्हणाली.
(हेही वाचा – न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे ‘न्याय आपल्या दारी’; CJI Chandrachud यांनी सांंगितला वाढता आवाका)
Double Olympic medallist #ManuBhaker said that her mother and coach are her biggest inspirations in life, highlighting their strong role in shaping her shooting career.
Know more 🔗 https://t.co/MNQO77DKja pic.twitter.com/tbnd8PohzA
— The Times Of India (@timesofindia) September 23, 2024
(हेही वाचा – Cabinet Decision : करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा)
अलीकडेच मनु भाकर (Manu Bhaker) सोशल मीडियावर एका गोष्टीसाठी ट्रोल झाली होती. सगळ्या समारंभांना ती तिचं ऑलिम्पिक पदक घेऊन जाते यावरून काही लोक तिच्यावर नाराजी व्यक्त करत होते. त्यावरही मनु उघडपणे बोलली. ‘असं लोक बोलतात तेव्हा वाईट नक्की वाटतं. पण, आयोजकांचीच अनेकदा इच्छा असते, मी पदक घेऊन यावं. आणि मी ते कमावलंय. तर मी का ते लोकांना दाखवू नये. ही पदकं माझी ओळख आहेत. मी इथून पुढेही ती कार्यक्रमांना घेऊन जाईन,’ असं मनु (Manu Bhaker) म्हणाली. जिंकण्यासाठी कशातून प्रेरणा मिळते हे सांगताना तिने अमेरिकन जगज्जेता धावपटू युसेन बोल्टचं तिने नाव घेतलं. ‘युसेन बोल्टच्या पुस्तकातून मला जिंकण्याची प्रेरणा मिळाली आहे. तरुणांना जर एक पुस्तक वाचण्यासाठी सुचवायचं झालं तर मी युसेन बोल्टचं आत्मचरित्र सुचवेन,’ असं मनु (Manu Bhaker) म्हणाली.
मनु एकीकडे अशा सत्कार समारंभांमध्ये व्यस्त असली तरी तिने लॉस एंजलीस ऑलिम्पिकचा सरावही आतापासूनच सुरू केला आहे. पुढील ऑलिम्पिकमध्ये पदकाचा रंग बदलण्यासाठी ती प्रयत्नशील असणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community