Marathon Champion Dies : मॅरेथॉनमधील विक्रमवीर केल्विन किपटमचा अपघाती मृत्यू

किप्टन आणि त्याचे रवांडाचे प्रशिक्षक गाडीने प्रशिक्षणाच्या ठिकाणी जात असताना अपघात झाला. 

329
Marathon Champion Dies : मॅरेथॉनमधील विक्रमवीर केल्विन किपटमचा अपघाती मृत्यू
  • ऋजुता लुकतुके

मॅरेथॉनमधील विक्रमवीर आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) सुवर्ण पदकाचा दावेदार असलेला केल्विन किपटमचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. पश्चिम केनियात हा अपघात झाला. २४ वर्षीय किपटम आणि त्याचे रवांडाचे प्रशिक्षक गर्वेस हकिझिमाना यांच्यासह एक महिलाही गाडीत होती. दोघं कॅपटागाट इथून ओल्डोरेट इथं चालले होते. पण, गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. दोघंही जागीच ठार झाले. तर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Marathon Champion Dies)

‘किपटम हे गाडी चालवत होते. आणि प्रशिक्षक हकिझिमाना मागे बसले होते. किपटम यांचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं. आणि गाडी पलटी होत रस्त्याच्या कडेला आदळली. दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील तिसरा प्रवासी एक महिला दुखापतग्रस्त आहे,’ असं केनिया पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. (Marathon Champion Dies)

(हेही वाचा – Ranji Trophy 2024 : छत्तीसगड विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवून मुंबई रणजी स्पर्धेच्या बाद फेरीत)

क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच किपटमने शिकागो मॅरेथॉन जिंकताना २ तास ३५ सेकंदांचा विश्वविक्रम केला होता. फक्त २३ वर्षांचा असताना आपल्या तिसऱ्या मॅरेथॉनमध्ये किपटमने ही कामगिरी केली. आणि आधीचा विक्रम तब्बल ३४ सेकंदांनी मोडला. या कामगिरीमुळे जगाचं लक्ष त्याने आपल्याकडे वेधलं होतं. त्यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्येही तो विजेता ठरला होता. (Marathon Champion Dies)

सुरुवातीलाच मिळालेल्या यशानंतर किपटमचे हौसले बुलंद होते. आणि मॅरेथॉन स्पर्धा दोन तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. इतकंच नाही तर एप्रिल महिन्यात रॉटरडॅम इथं होणाऱ्या मॅरेथॉनमध्येच तो २ तासांपेक्षा कमी वेळेत शर्यत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार होता. अशा ॲथलीटचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. (Marathon Champion Dies)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.