Mary Kom : मेरी कोमने पॅरिस ऑलिम्पिक पथकाची ‘शेफ द मिशन’ व्हायला नकार का दिला?

Mary Kom : मेरी कोमने त्यासाठी खाजगी कारण पुढे केलं आहे

189
Mary Kom : मेरी कोमने पॅरिस ऑलिम्पिक पथकाची ‘शेफ द मिशन’ व्हायला नकार का दिला?
Mary Kom : मेरी कोमने पॅरिस ऑलिम्पिक पथकाची ‘शेफ द मिशन’ व्हायला नकार का दिला?
  • ऋजुता लुकतुके

ऑलिम्पिक पदकविजेती आणि सहावेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली मेरी कोमने (Mary Kom) पॅरिस ऑलिम्पिकसाठी (Paris Olympics) शेफ दी मिशन होण्याला ऐन वेळी नकार दिला आहे. यापूर्वी तिच्या नावाची अधिकृत घोषणा झाली होती. पण, आता भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी तिच्या माघारीची बातमी दिली आहे. तिने घरगुती कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचं ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटलंय.  (Mary Kom)

(हेही वाचा- Iran-Israel : एअर इंडियाने इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण करणे थांबवले)

‘मेरीला शेफ दी मिशन पद सोडण्यावाचून पर्याय नव्हता.’ असं पी टी उषा मीडियाशी बोलताना म्हणाल्या. ‘देशाचं कुठल्याही पातळीवर प्रतिनिधित्व करायचं असेल तर त्यासाठी मी सदैव तयार असते. आताही ऑलिम्पिक पथकाची शेफ दी मिशन होणं हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट होती. पण, मला खेदाने हे सांगावं लागत आहे. की, मी ही जबाबदारी सध्या पार पाडू शकत नाही. माझ्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याने नाईलाजाने मी हा निर्णय घेत आहे,’ असं मेरी कोमने क्रीडा मंत्रालय (Ministry Sports) आणि ऑलिम्पिक असोसिएशनला कळवलं आहे.  (Mary Kom)

(हेही वाचा- Dhoni, Sachin & Rohit : धोनी, सचिन आणि रोहित एकाच टेबलवर बसलेला व्हीडिओ व्हायरल )

२१ मार्चला तिची शेफ दी मिशन म्हणून निवड झाली होती. त्यानंतर अचानक मेरीने ही माघार घेतील. पण, पी टी उषा (PT Usha) यांनी शुक्रवारी मेरी कोमशी संपर्क साधला आहे. आणि ही बातमी चांगली नसली तरी प्राप्त परिस्थितीत स्वीकारावी लागणार आहे, असंच उषा यांनी त्यानंतर मीडियाशी बोलून दाखवलं. काही दिवसांतच नवीन प्रक्रिया पार पाडून नव्या शेफ दी मिशनची नियुक्ती करण्यात येणार आहे. (Mary Kom)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.