भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मास्टरकार्डसोबत टायटल स्पॉन्सर करार केला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मास्टरकार्ड भारतीय संघाचे शीर्षक प्रायोजक असणार आहे.
असेही सांगितले जात आहे की, मास्टरकार्ड हे घरच्या मैदानावर आयोजित सर्व सामने आणि आंतरराष्ट्रीय सामने बीसीसीआय तर्फे आयोजित केलेल्या इराणी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी तसेच 19 आणि 23 र्षांखालील सर्व ज्युनियर क्रिकेट सामन्यांसाठी शीर्षक प्रायोजक असणार आहे. वरील सर्व सामने भारतात होणार असून जगभरातील तसेच देशभरातील क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहचण्यासाठी मास्टरकार्ड हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर! म्हणाले, “तुमचे मिशन मराठी माणसाला गाडा आणि…”)
जुलै महिन्याच्या सुरूवातीला पेटीएमने बीसीसीआयकडे टायटल स्पॉन्सरशिप पुढे न वाढवण्याची मागणी केली होती. पेटीएमनेच हे अधिकार मास्टरकार्डला देण्याबाबतही यावेळी बीसीसीआयला सल्ला दिला आहे. या करारानंतर आता मास्टरकार्डकडून बीसीसीआयला भारताच्या एका सामन्यानंतर जवळपास ३.८ कोटी रूपये मिळणार आहेत.
Join Our WhatsApp Community