Match Fixing in Domestic Cricket? श्रीवत्स गोस्वामीची कोलकाता क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगची तक्रार

श्रीवत्स गोस्वामीच्या आरोपांनंतर बंगाल क्रिकेट असोसिएशनने चौकशी सुरू केली आहे. 

285
Match Fixing in Domestic Cricket? श्रीवत्स गोस्वामीची कोलकाता क्रिकेट लीगमध्ये मॅच फिक्सिंगची तक्रार
  • ऋजुता लुकतुके

२००८ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा विजेत्या भारतीय संघाचा (Indian Team) माजी सदस्य श्रीवत्स गोस्वामीने कोलकाता क्रिकेट लीगमधील एका सामन्या दरम्यान मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) संशय व्यक्त केला आहे. बंगाल असोसिएशनने आयोजित केलेला हा प्रथम विभागीय सामना होता. गोस्वामीने हा आरोप थेटपणे आपल्या फेसबुक पेजवर केला आहे. काही फोटो प्रसिद्ध करताना सामन्यातील काही बळी हे घडवून आणलेले होते, असा आरोपच त्याने केला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने यावर फारसं बोलायचं टाळलं असलं तरी चौकशी करू असं आश्वासन दिलं आहे. (Match Fixing in Domestic Cricket?)

मोहमेडन स्पोर्टिंग आणि टाऊन क्लब दरम्यानचा हा सामना होता. इथं मोहमेडन क्लबचा फलंदाज जाणून बुजून आपली विकेट फेकत होता, असा गोस्वामीचा आरोप आहे. कारण, भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक देबव्रत दास हे टाऊन क्लबशी निगडित आहेत. आणि टाऊन क्लबला या सामन्यातून ७ गुण मिळावेत यासाठी मोहमेडन संघाचे फलंदाज त्यांना मदत करत होते, असं गोस्वामीचं म्हणणं आहे. (Match Fixing in Domestic Cricket?)

(हेही वाचा – Sachin, Dhoni, Rohit in Jamnagar : अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग समारंभासाठी क्रिकेटपटू आले जामनगरमध्ये)

गोस्वामीच्या आरोपांची चौकशी करू – स्नेहाशिष गांगुली 

दास सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. आणि २०२२ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर ते संघाचे व्यवस्थापक होते. गोस्वामीने पोस्ट केलेल्या पहिल्या व्हिडिओत फलंदाज सरळ यष्ट्यांच्या दिशेनं येणारा चेंडू बॅटने अडवण्याचा प्रयत्नही करत नाही. त्यामुळे तो बाद होतो. तर दुसऱ्या व्हिडिओत डावखुरा फलंदाज वाईड चेंडूवर यष्टीचित झाला आहे. हे दोन्ही फलंदाज खराब चेंडूंवर जाणूनबुजून बाद झाले असं गोस्वामीचं म्हणणं आहे. (Match Fixing in Domestic Cricket?)

देबव्रत दास या आरोपांनंतर मीडियाला टाळत आहेत. त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी स्पर्धा आयोजक आणि असोसिएशनच्या स्पर्धा नियामक मंडळाची बैठक बोलावल्याचं सांगितलं आहे. गोस्वामीच्या आरोपांची चौकशी करू असं आश्वासन गांगुली यांनी दिलं आहे. (Match Fixing in Domestic Cricket?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.