MCA Election : अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष

MCA Election : अजिंक्य यांनी संजय नाईक यांचा २२१ विरुद्ध ११४ मतांनी पराभव केला.

191
MCA Election : अजिंक्य नाईक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष
  • ऋजुता लुकतुके

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीत अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा २२१ विरुद्ध ११४ मतांनी पराभव केला. गंमत म्हणजे अजिंक्य नाईक यापूर्वी एमसीएचे सचिव होते आणि संजय नाईक उपाध्यक्ष. त्यामुळे आता अजिंक्य नाईक अध्यक्ष झाल्यावर सचिव पदासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. (MCA Election)

शिवाय एमसीए कार्यकारिणीचा एक वर्षाहून कमी काळ शिल्लक आहे. त्यानंतर संपूर्णपणे नवीन निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. अशावेळी आताची निवडणूक घेण्याचा खटाटोप का केला, असा प्रश्न विचारला जात आहे. (MCA Election)

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अमेरिकेत टी-२० विश्वचषकासाठी गेले असताना अचानक निधन झालं होतं. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. आणि एमसीएने लगेचच त्यासाठी निवडणूक घेण्याचं ठरवलं. आधी काँग्रेसचे भूषण जाधवही निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, ही पूर्ण मुदतीची निवडणूक नसल्यामुळे ऐनवेळी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आणि पुढील वर्षी असलेल्या मोठ्या निवडणुकीची तयारी करत असल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं. (MCA Election)

(हेही वाचा – Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर सोने धाडकन कोसळले!)

त्यामुळे लढत एमसीएचे सचिव आणि उपाध्यक्ष यांच्यात उरली होती. अशा या लढतीत अजिंक्य नाईकला डायना एडलजी यांनी पाठिंबा जाहीर केला होता. तिथेच त्यांची बाजू बळकट झाली होती. शिवाय जितेंद्र आव्हाड, आशिष शेलार या राजकीय नेत्यांनीही त्यांच्यामागे ताकद उभी केली होती. (MCA Election)

ही निवडणूक जिंकल्यानंतर पावसाळ्यात मुंबईकर क्रिकेटपटूंना सराव करता यावा म्हणून इनडोअर अकादमीची सोय करणार असल्याचं अजिंक्य यांनी म्हटलं आहे. तर मागच्या ३ वर्षांत मुंबईने रणजी विजेतेपदासह ७ महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्याचंही म्हटलं आहे. (MCA Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.