क्रिकेटप्रेमींमध्ये दरवर्षी IPL केव्हा सुरू होणार याबाबत उत्सुकता असते. सध्या इंडियन प्रिमिअर लीग २०२३ चे मिनी ऑक्शन कोचीमध्ये सुरू आहे. यासाठी IPL च्या सर्व १० फ्रॅंचायझी केरळमध्ये दाखल झाल्या आहेत. या लिलावामध्ये ३६९ खेळाडूंवर बोली लागणार आहे. दरम्यान २०२३ मध्ये IPL केव्हा सुरू होणार याबाबत आता BCCI ने संकेत दिले आहेत.
( हेही वाचा : मुंबई ते गोवा मार्गावर ‘शिवशाही’ प्रवास! एसटी महामंडळाकडून प्रवाशांना नववर्षाचे गिफ्ट…)
२०२३ मध्ये IPL विलंबाने सुरू होणार
यंदा IPL 2023 एक आठवडा विलंबाने सुरू होणार असल्याची शक्यता काही पदाधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. दरवर्षी ही स्पर्धा मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होते परंतु यंदाच्यावर्षी IPL एप्रिलच्या सुरूवातीला सुरू होणार आहे. BCCI ने यंदा IPL १ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल असे फ्रॅंचायझींना कळवले आहे. पहिली महिला IPL स्पर्धा ३ मार्चपासून सुरू करण्याचा BCCI चा विचार आहे त्यामुळे पुरुष IPC स्पर्धेला विलंब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महिला IPL २३ दिवस सुरू राहणार असून २६ मार्चला फायनल होणार आहे. दरम्यान पुरूष IPL साठी सध्या केरळमध्ये मिनी ऑक्शन सुरू आहे.
Join Our WhatsApp Community