विजेतेपदाचा चषक स्वीकारतानाची Messi आणि Rohit ची चाल चर्चेत

टी-२० विश्वचषक स्वीकारण्यासाठी रोहित पोडिअमवर गेला तो मेस्सीची नक्कल करत

154
विजेतेपदाचा चषक स्वीकारतानाची Messi आणि Rohit ची चाल चर्चेत
विजेतेपदाचा चषक स्वीकारतानाची Messi आणि Rohit ची चाल चर्चेत
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) करंडक स्वीकारण्यासाठी पोडिअमवर एका खास स्टाईलमध्ये गेला. संघ सहकाऱ्यांच्या शिफारसीवरून त्याने फिफा विश्वचषक विजेत्या अर्जेंटाईन कर्णधार लियोनेल मेस्सीची (Lionel Messi) नक्कल केली. विजेत्याची चाल म्हणून ती चाल तेव्हा लोकप्रिय झाली होती. कतारमध्ये विश्वचषक जिंकलेला मेस्सी, मग वेस्ट इंडिजमध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आता पुन्हा कोपा अमेरिका जिंकलेला अर्जेंटिना अशी तीनदा ही चाल लोकांना दिसली. आणि सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय होतेय.

अर्जेंटिनाचं हे विक्रमी सोलावं कोपा अमेरिका विजेतेपद होतं. आणि ते स्वीकारण्यासाठी मेस्सी गेला तो पुन्हा एकदा दोन हात चषकाच्या दिशेनं पुढे करत पण, एक – एक पाऊल हळू हळू पुढे टाकत. ही त्याची चाल आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. अर्जेंटिनाने कोपा अमेरिका चषकाच्या अंतिम फेरीत कोलंबियाला १-० ने हरवलं. आणि अतिरिक्त वेळेत मार्टिनेझने केलेला गोल मोलाचा ठरला.

(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पॅरिसला जाणाऱ्या खेळाडूंना विराटच्या शुभेच्छा)

विश्वचषक विजेतेपदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रोहीतला या चालीविषयी विचारलं होतं. ही कुणाची कल्पना होती, असं विचारल्यावर, ‘कुलदीप आणि चहल,’ असं उत्तर रोहितने दिलं होतं. संघातील भारावलेलं वातावरण त्या कृतीतून प्रतित होत होतं.

(हेही वाचा – आता मुंबईतील पूरस्थिती समजणार एका क्लिकवर; ‘Mumbai Flood App’चा कसा होणार फायदा?)

‘भारतीय संघ आयसीसी विजेतेपदाची खूप काळ वाट पाहत होता. त्यामुळे ते स्वप्न अखेर पूर्ण झाल्यावर चषक उंचवण्याची वेळ झाली, तेव्हा संघात खेळाडूंच्या भावना अनावर झाल्या होत्या. आणि चषक स्वीकारताना काहीतरी वेगळं करावं, असं सगळ्यांनाच वाटत होतं. म्हणून मी लियोनेल मेस्सीसारखा (Lionel Messi) पोडिअमपर्यंत चालत गेलो,’ असं रोहितने पंतप्रधानांशी बोलताना सांगितलं होतं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.