लिओनेल मेस्सीचा नवा भिडू! ‘पीएसजी’सोबत किती कोटींचा केला करार?

लिओनेल मेस्सीला पीएसजीकडून वार्षिक २५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे, हा करार दोन वर्षांचा असणार आहे,

अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, ज्याने सहा वेळा बालोन डी’ओरचे विजेतेपद पटकावले, त्याने बार्सिलोनापासून वेगळे होणे स्वीकारले आहे. पैशाच्या अडचणीमुळे बार्सिलोनाने मेस्सीसोबत करार वाढवण्याचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे  मेस्सीने त्यांच्या जुन्या फुटबॉल क्लब बार्सिलोनापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मेस्सी आता कोणत्या क्लबसोबत खेळणार, अशी उत्सुकता क्रीडा जगताला लागली होती. त्यानुसार मेस्सीने अंतिम निर्णय घेतला असून त्याने पॅरिस सेंट जर्मेन फूटबॅाल क्लब (पीएसजी) सोबत करार केला आहे.

२५७ कोटी रुपयांचा करार! 

अहवालानुसार, त्याला पीएसजीकडून वार्षिक २५७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळण्याची अपेक्षा आहे, हा करार दोन वर्षांचा असणार आहे, जो २०२४ पर्यंत वाढवता येईल. पीएसजीने मेस्सीसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. करारामध्ये तिसऱ्या वर्षांचा पर्याय देखील आहे, परंतु वैद्यकीय आधारावर त्याचा निर्णय घेतला जाईल.

२१ वर्षांचे संबंध संपवले! 

बार्सिलोना सोडल्यानंतर मेस्सीकडे आणखी दोन पर्याय होते, पण त्याने पीएसजीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. बार्सिलोना आणि मेस्सी यांच्यातील पैशांचा व्यवहार हा एक मोठा मुद्दा होता, ज्यामुळे या महान फुटबॉलपटूने या फुटबॉल क्लबसोबतचा २१ वर्षांचा संबंध संपवण्याचा निर्णय घेतला. मेस्सी आणखी पाच वर्षे बार्सिलोनासोबत राहण्यास तयार असला तरी, क्लबने आर्थिक समस्यांचे कारण देत त्याच्याशी संबंध तोडले.

(हेही वाचा : फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने का सोडला बार्सिलोना क्लब? किती होती त्याची कमाई?)

बार्सिलोनाशी संबंध तोडायचा नव्हता!

३४ वर्षीय मेस्सीने बार्सिलोना सोडले. त्याला बार्सिलोनाशी संबंध तोडायचा नव्हता. तो अर्ध्या पगारावरही खेळायला तयार होता, पण स्पॅनिश लीगच्या आर्थिक नियमांमुळे मेस्सी क्लबशी नवीन करार करू शकला नाही. बार्सिलोनामध्ये असताना मेस्सीने १७ वर्षांत विक्रमी ३४ ट्रॉफी जिंकल्या आणि विक्रमी ७७८ सामन्यांमध्ये ६७२ गोल केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here