-
ऋजुता लुकतुके
स्पेनच्या बार्सिलोना इथं राहणारे छायाचित्रकार जोन मॉनफोर्ट मागची ३० वर्षं क्रीडाविषयक छायाचित्रण करत आहेत. त्यांनी २००७ साली काढलेला एक फोटो सध्या जगभर व्हायरल होतोय. आणि अगदी जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचला आहे. युनिसेफच्या एका सत्रात तेव्हा २० वर्षांचा असलेल्या मेस्सीच्या हातात एक बाळ आहे. आणि तेव्हा सुपरस्टार असलेला मेस्सी या बाळाच्या आईबरोबरही फोटो काढताना दिसला होता. (Messi vs Yamal)
हा फोटो म्हणजे एका सुपरस्टारने भावी सुपरस्टारला कडेवर घेतलेला फोटो होता, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण, फोटोतील छोटं बाळ म्हणजे तेव्हा काही दिवसांचा असलेला लेमिन यमाल आहे. यमाल मागच्या १३ जुलैला १७ वर्षांचा झाला. आणि स्पेनसाठी ही युरोचषक स्पर्धा गाजवताना त्याने संघाला विजेतेपदही पटकावून दिलं आहे. (Messi vs Yamal)
(हेही वाचा – Kolhapur जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली!)
यमालने उपान्त्य फेरीत फ्रान्सविरुद्ध केलेला गोल हा स्पर्धेतील सर्वोत्तम मानला जातो. लियोनेल मेस्सीच्या वडिलांनी अलीकडे हा फोटो इन्स्टाग्रामवर पुन्हा शेअर केला. यात आणखी एका फोटोत बाळ बाथटबमध्ये आहे. आणि बाळाच्या आईबरोबरच मेस्सीही बाळाला निरखून बघतोय. मेस्सीच्या वडिलांनी, ‘दोन दिग्गजांची सुरुवात,’ असा मथळा या फोटोला दिला आहे. (Messi vs Yamal)
‘माझं आयुष्य अचानक स्वप्नवत झालं आहे. एके दिवशी रात्री बारा वाजता मला फोन आला की, हा फोटो तुमचा आहे का? मला आधी फोटो बघावा लागला. मग मी तपासून पाहिलं. फोटो माझा होता. मग मी विचारलं, मेस्सीबरोबर फोटोत कुठलं बाळ आहे. आणि समोरून आवाज आला, ‘एक लियोनेल मेस्सी आणि दुसरा यमाल. माझा विश्वासच बसेना,’ असं मॉनफोर्ट यांनी सीएनएनशी बोलताना सांगितलं. (Messi vs Yamal)
मेस्सी आणि यमाल (Messi vs Yamal) दोघेही बार्सिलोना क्सबच्या ला मसिया अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी आहेत. मेस्सीने १८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलला सुरुवात केली. तर यमाल १६ व्या वर्षीच स्पेनच्या संघात चमकला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community