आयपीएलमधील बहुप्रतिक्षित सामना वानखेडेवर पाहायला मिळणार आहे. आयपीएलचे विक्रमी ५ वेळा जेतेपद पटकावणारे चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स अशा मोठ्या संघांमध्ये आज लढत होणार आहेत. मुंबई इंडियन्सने पहिले तीन सामने गमावले असले, तरी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने नंतरचे दोन सामने जिंकून पुनरागमन केले आहे. त्याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जही या हंगामात तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (MI vs CSK Match)
(हेही वाचा – Unauthorized Constructions: अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम १५ एप्रिलपासून पुन्हा सुरू होणार – ठाणे आयुक्त)
होणार अटीतटीची लढत
एल क्लासिको (El Classico) हा एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ उत्कृष्ट आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोना आणि रिअल मॅड्रिड एफसी यांच्यातील सामने फारच चुरशीचे होतात. हा शब्द त्या दोन्ही संघांमधील चुरस आणि द्वंद्व दर्शवतो. या दोन्ही संघांच्या लढतीला एल क्लासिको (El Classico) असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामन्यातही चुरस असते आणि म्हणून आयपीएलमधील या सामन्याला एल क्लासिको म्हणतात.
धोनीचे अखेरचे वर्ष
आयपीएलच्या १७ व्या मोसमात चेन्नईने आतापर्यंत ५ पैकी ३ सामने जिंकले आहेत. मुंबई इंडियन्सने ५ पैकी २ सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. आणि संघ सातव्या स्थानावर आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ ३८ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी मुंबई इंडियन्सने २१ वेळा, तर चेन्नई सुपर किंग्सने १७ वेळा विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद यंदा धोनीने ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवले आहे. ४२ वर्षीय धोनी यंदाचे हे अखेरचे वर्ष आयपीएल खेळणार आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स वि चेन्नईचा हा सामना धोनीचा वानखेडेवरील अखेरचा सामना असू शकतो. (MI vs CSK Match)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community