MI vs LSG : शेवटच्या क्षणी असं काय झालं? ज्यामुळे तिलक वर्माला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला

124
MI vs LSG : शेवटच्या क्षणी असं काय झालं? ज्यामुळे तिलक वर्माला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला
MI vs LSG : शेवटच्या क्षणी असं काय झालं? ज्यामुळे तिलक वर्माला निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला
  • ऋजुता लुकतुके

लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सचा (MI vs LSG) अटीतटीच्या लढतीत १२ धावांनी पराभव केला. मुंबईने नाणेफेक जिंकून लखनौला आधी फलंदाजी करण्याचं निमंत्रण दिलं होतं. आणि त्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौने दोनशे धावांची मजल मारली. हे आव्हान पार करताना मुंबई आवश्यक धावगतीच्या सतत मागे होती. आणि अखेर संघाचा पराभव झाला. मुंबईसाठी हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) ३५ धावांत ५ बळी घेतले. पण, एडन मार्करम (Aiden Markram) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांनी सुरुवातीला कुणाला दाद दिली नाही. आणि लखनौसाठी भक्कम पायाभरणी केली.

सामन्यात मुंबई इंडियन्सने निकराचा प्रयत्न केला. आणि यातील एक निर्णय लक्षवेधीही ठरला. २३ चेंडूंत २५ धावा करणारा इम्पॅक्ट सब खेळाडू तिलक वर्माला (Tilak Varma) मुंबई संघ प्रशासनाने १९ व्या षटकांत परत बोलावलं. त्याला ऐन सामना सुरू असताना निवृत्त करण्यात आलं आणि त्याच्या ऐवजी मिचेल सँटनर (Mitchell Santner) मैदानावर उतरला.

(हेही वाचा – Tariff War : भारतीय शेअर बाजारातील घसरणीमागची ४ कारणं)

तरीही मुंबईला १२ धावा कमी पडल्या. तिलक मैदानात होता तेव्हा मुंबईला विजयासाठी ७ चेंडूंत २४ धावा हव्या होत्या. अखेर मुंबई यातील १२ धावा करू शकली. आणि संघाचा पराभव झाला. तिलक मैदानात उतरला तेव्हा मुंबईने ८ षटकांत ३ बाद ८६ धावा केल्या होत्या. म्हणजे संघाची धावगती आवश्यकते प्रमाणेच १० धावांची होती. पण, त्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत असतानाही तिलक वर्माला (Tilak Varma) सूर गवसला नाही. आणि तो अपेक्षित वेगाने धावा वाढवू शकला नाही.

‘तिलकने जोरदार फटके खेळायचे किंवा तशा प्रयत्नांत बाद व्हायचं यासाठी प्रयत्न केले. जेणेकरून नवीन फलंदाज तरी आक्रमक फलंदाजीसाठी प्रयत्न करू शकला असता. पण, मनात असतं तसं होतंच असं नाही. त्यामुळे अखेर तो धावा वाढवू शकत नाहीए असं पाहून शेवटच्या क्षणी आम्ही त्याला निवृत्त करण्याचा निर्णय घेतला,’ असं मुंबई इंडियन्सचा कर्णधार महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी सांगितलं.

आयपीएलमध्ये सामना सुरू असताना एखाद्या खेळाडूला निवृत्त करण्याची मुभा फ्रँचाईजींना आहे. यापूर्वी चार फलंदाजांना असं निवृत्त करण्यात आलं आहे. बहुतांशी धावगती न राखता आल्यामुळेच संघ हा निर्णय घेतात. कारण, आयपीएल हा वेगवान खेळ आहे. एकदा निवृत्त झालेला फलंदाज पुन्हा परतू शकत नाही.

(हेही वाचा – Vilas Ujwane : ‘चार दिवस सासूचे’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन)

यापूर्वी निवृत्त झालेले खेळाडू,

आर अश्विन वि. लखनौ सुपर जायंट्स (२०२२)

अथर्व तायडे वि. डेक्कन चार्जर्स (२०२३)

साई सुदर्शन वि. मुंबई इंडियन्स (२०२३)

तिलक वर्मा वि. लखनौ सुपरजायंट्स (२०२५)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.