Michael Schumacher : दिग्गज फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकर सध्या काय करतो?

फेरारीचा स्टार फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकरला २९ डिसेंबर २०१३ मध्ये स्किइंग करताना अपघात झाला होता, त्यानंतर तो कोमामध्येच होता.

253
Michael Schumacher : दिग्गज फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकर सध्या काय करतो?
Michael Schumacher : दिग्गज फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकर सध्या काय करतो?

ऋजुता लुकतुके

२९ डिसेंबर २०१३ रोजी फॉर्म्युला वनचा दिग्गज ड्रायव्हर मायकेल शुमाकरला (Michael Schumacher) फ्रान्समध्ये आल्प्स पर्वत रांगांमध्ये स्किइंग करताना गंभीर दुखापत झाली होती. जीवावर बेतलेल्या या अपघातानंतर जून २०१४ पर्यंत शुमाकर वैद्यकीय प्रयत्नांनी कोमातच होता. सप्टेंबर २०१४ पासून तो त्याच्या लेक जिनिव्हा इथल्या घरीच आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे उपचार सुरू असून त्याची पत्नी कोर्टिना त्यावर लक्ष ठेवून असते.

शुमाकर ७ विक्रमी सातवेळा फॉर्म्युला वन विजेता ठरला होता. त्यामुळे जगभरात त्याचे असंख्य चाहते आजही आहेत. आणि त्या सर्वांना एक कुतुहल मिश्रित प्रश्न असतो की, शुमाकरचं पुढे काय झालं?

जर्मनीतील बिल्ड या वृत्तपत्राने शुमाकरला झालेल्या अपघाताच्या दहा वर्षांनंतर त्याची सध्याची दिनचर्या आणि तो सध्या काय करतो हे सांगणारा एक सविस्तर लेख २९ डिसेंबर २०२३ ला छापला आहे. हा लेखही पुढल्या २ दिवसांत जगभर व्हायरल झाला आहे.

(हेही वाचा-Kho Kho National Championship : महाराष्ट्राच्या कुमार संघांना दुहेरी मुकुट )

फॉर्म्युला वन हा शुमाकरचा प्राण होता. जवळ जवळ २० वर्षं त्याने या खेळात घालवली. त्यामुळे शुमाकरच्या निद्रिस्त मेंदूला चालना मिळावी यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने शुमाकरला फेरारी तळावर नेऊन फॉर्म्युला वन कारची रपेटही अलीकडेच घडवून आणण्यात आली आहे. तिथले ओळखीचे आवाज ऐकून शुमाकरचा मेंदू त्यांना प्रतिसाद देईल, असा तज्जांचा अंदाज होता.

शुमाकरच्या सध्याच्या दिनचर्येविषयी बिल्ड दैनिकातील लेखात म्हटलंय की, ‘शुमाकर अजूनही २४ तास वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली असतो. त्याच्या घरी १५ डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा चमू त्यासाठी तैनात ठेवण्यात आला आहे. पत्नी कोर्टिना या उपचारांवर देखरेख करते.’

शुमाकरच्या कुटुंबीयांनी तो आजारी पडल्यानंतर उपचार आणि इतर कुठलीही माहिती आजतागायत शेअर केलेली नाही. त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात येते. २०१८ मध्ये कुटुंबीयांकडून शुमाकरचा शेवटचा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र तो त्याला अपघात होण्याच्या काही दिवस आधीचा होता.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.