इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 साठी खेळाडूंचा मिनी लिलाव पूर्ण झाला आहे. तो ऐतिहासिक लिलाव ठरला. या लिलावात तीन महागड्या खरेदीसह नवे विक्रम झाले आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी, विशेषत: अष्टपैलू खेळाडूंसाठी, फ्रँचायझी मालक त्यांच्या संघांच्या मागण्या आणि आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. विशेष बाब म्हणजे या लिलावात पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंपैकी तीन इंग्लंडचे खेळाडू आहेत.
सॅम करन आणि कॅमेरून ग्रीन यांनी रचला इतिहास
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने अनुक्रमे १८.५० कोटी आणि १७.५० कोटी रुपयांना विकत घेतले. ग्रीनने पॅट कमिन्सला मागे सोडले, ज्याला 2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने १५.५ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्सने १६.२५ कोटींना खरेदी केले
त्याचवेळी इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने १६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. निकोलस पूरनला वेस्ट इंडिजच्या खेळाडूसाठी आतापर्यंतची सर्वोच्च किंमत मिळाली. लखनऊ सुपरजायंट्सने त्याला 16 कोटींची बोली लावून विकत घेतले. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. हैदराबादने मयंक अग्रवाललाही ८.२५ कोटींना खरेदी केले. शिवम मावीला गुजरात टायटन्सने ६ कोटींना विकत घेतले, तर मुकेश कुमारला दिल्ली कॅपिटल्सने ५.५० कोटींना विकत घेतले. ४० वर्षीय अमित मिश्राला लखनौ सुपरजायंट्सने ५० लाख रुपयांना विकत घेतले.
( हेही वाचा: IPL 2023 मध्ये मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या पदरी निराशा!, तर ‘हे’ खेळाडू राहिले UNSOLD )
‘या’ खेळाडूंना खरेदीदार मिळाले नाहीत
अनेक बड्या खेळाडूंना लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही. यामध्ये टॉम बॅटन, राशी व्हॅन डी ड्युसेन, ट्रॅव्हिस हेड, जिमी नीशम, जेमी ओव्हरटन, ख्रिस जॉर्डन, अॅडम मिलने, डेव्हिड मलान, तबरेझ शम्सी, मोहम्मद नबी, तस्किन अहमद, कुशल मेंडिस, वेन पारनेल आणि शेरफेन रदरफोर्ड या खेळाडूंचा समावेश होता.
८० खेळाडूंसाठी १६७ कोटी रुपये खर्च केले
डिसेंबर रोजी झालेल्या लिलावात ८० खेळाडूंना खरेदी करण्यासाठी आयपीएल संघांनी १६७ कोटी रुपये खर्च केले. २९ परदेशी खेळाडू आणि ५१ भारतीय खेळाडूंना आगामी लीगसाठी दहा संघांनी खरेदी केले आहे.
Join Our WhatsApp Community