हाताला झाली होती दुखापत तरीही हार न मानता… मीराबाई चानूने जिंकले ‘रौप्यपदक’

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने आणखी कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले आहे. हा स्पर्धेदरम्यान तिच्या हाताला दुखापत झाली होती. सर्व अडचणींवर मात करत मीराबाई चानूने हे पदक जिंकले आहे.

( हेही वाचा : ATM मधून पैसे नाही चक्क येतंय सोनं…ग्राहकही झाले खूश, पहिल्या रिअल-टाइम गोल्ड एटीएमची जगभरात चर्चा! )

२८ वर्षीय मीराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात एकूण २०० किलो वजन उलचून रौप्य पदक पटकावले आहे. चीनच्या हुआहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

मीराबाई चानूने २०१७ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. चानूने रौप्यपदक जिंकल्यानंतर प्रशिक्षक विजय शर्मा म्हणाले की, या स्पर्धेची आम्हाला फारशी चिंता नाही. आमचे लक्ष तिला झालेल्या दुखापतीवर आहे. आगामी स्पर्धांना अजून वेळ आहे. अशा परिस्थितीत, दुखापतीतून सावरून चानू हळूहळू वजन वाढवेल. चानूला सरावाच्या वेळी ही दुखापत झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here