Sports : राज्यातील खेळाडूंची उंची वाढवण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना

311
राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचाविण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा (Sports) व खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्र बिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत ‘मिशन लक्ष्यवेध’ आराखडा तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने क्रीडा विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून ‘मिशन लक्ष्यवेध’ ही महत्त्वकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
क्रीडा (Sports) क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी यासंबंधी करार करण्यात येणार आहे. या योजनेच्या सनियंत्रणासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे रुपांतर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण करण्यात येणार आहे. प्रथम टप्यात १२ खेळ निश्चित केले आहेत. त्यामध्ये अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, आर्चरी, शुटींग, रोईंग, सेलिंग, लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. तसेच विभागीय स्तरावर ३७ स्पोर्टस एक्सलन्स सेंटर व जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहेत. जिल्हा विकास आराखडा तयार करुन १० टक्के निधी क्रीडा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्य असे स्पोर्टस सायन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय व जिल्हास्तरावर खेळाडूंसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना करिअरच्या संधीची माहिती दिली जाणार आहे. निवडलेल्या १२ खेळ प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.