Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ राबवणार- संजय बनसोडे

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा' आणि 'खेलो इंडिया' आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत मिशन लक्ष्यवेध ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे.

160
Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी 'मिशन लक्ष्यवेध' राबवणार- संजय बनसोडे
Mission Lakshyavedh : खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी उंचावण्यासाठी 'मिशन लक्ष्यवेध' राबवणार- संजय बनसोडे

नागपुरात सुरू असलेल्या  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की, राज्यातील खेळाडूंची कामगिरी सातत्याने उंचावण्यासाठी योजनाबद्ध कृती कार्यक्रम क्रीडा विभागाने हाती घेतला आहे. ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा’ आणि ‘खेलो इंडिया’ (Khelo India) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खेळाडूंना केंद्रबिंदू मानून खेळाडू व स्पर्धा केंद्रीत मिशन लक्ष्यवेध ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येणार आहे,असे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे (Sanjay Bansode) यांनी सांगितले. (Mission Lakshyavedh)

क्रीडा क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार करण्यात येणार असून या योजनेचे सनियंत्रणसाठी क्रीडा व युवक सेवा संचनालयाचे रूपांतर महाराष्ट्र क्रीडा प्राधिकरण करण्यात येणार आहे असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले. (Mission Lakshyavedh )

पहिल्या टप्प्यात १२ खेळांचा समावेश
मिशन लक्ष्यवेधी अंतर्गत पहिल्या टप्प्यात १२ खेळांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये अॅथलेटिक्स,बॅडमिंटन,बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती,आर्चरी,शुटींग,रोईंग,सेलिंग,लॉन टेनिस व टेबल टेनिस या खेळांचा समावेश आहे. या खेळांची हाय परफॉर्मन्स सेंटर राज्यात विविध ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच विभागीय स्तरावर ३६ स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर व प्रत्येक जिल्ह्यात १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्हा विकास आराखडा तयार करून १० टक्के निधी क्रीडा विकास आराखडयासाठी राखीव ठवण्यात येणार आहे. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुसज्य असे स्पोर्ट्स सायन्स सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर खेळाडूसाठी समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्याद्वारे खेळाडूंना कारिअरच्या संधीची माहिती दिली जाणर आहे. Mission Lakshyavedh

(हेही वाचा : Dharavi Project: धारावी प्रकल्पात टीडीआर घोटाळा असेल, तर ते पाप उद्धव ठाकरेंचे; आशिष शेलारांचा घणाघात

१६० कोटींचा निधी
निवडलेल्या विविध १२ खेळ प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी १६० कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षण केंद्र व इतर सुविधांकरिता जिल्हा स्तरावर अंदाजे ५५ कोटी,विभागीय स्तरावर ५५ कोटी आणि राज्य स्तरावर ५० कोटी खर्च अपेक्षित आहे.

३७४० खेळाडूंच्या अद्ययावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था
जिल्हास्तरावर १३८ क्रीडा प्रतिभा विकास केंद्राची स्थापना करण्यात येईल. त्याचबरोबर विभागीय मुख्यालयाच्या  ठिकाणी वरील निकषानुसार एकूण ३६ स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर १२ हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून जिल्हास्तरावर एकूण २७६०,विभागीय स्तरावर ७४० आणि राज्यस्तरावर २४० अशा एकूण ३७४० खेळाडूंच्या अद्यावत क्रीडा प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.