Moeen Ali Retired : स्टार इंग्लिश फिरकीपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक जाहीर केली निवृत्ती

Moeen Ali Retired : इंग्लिश संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.

76
Moeen Ali Retired : स्टार इंग्लिश फिरकीपटू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक जाहीर केली निवृत्ती
  • ऋजुता लुकतुके

विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये १० वेळा बाद करणारा खेळाडू असा त्याचा एकेककाळी लौकिक होता. त्यानंतर तो इंग्लिश संघाचा अव्वल फिरकीपटूही झाला. आताही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संघाची मदार मोईन अलीवरच आहे. अशावेळी मोईन अलीने (Moeen Ali Retired) अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. इंग्लिश संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, संघाची पुढील मालिका ही ऑस्ट्रलिलाविरुद्ध आहे. श्रीलंकेसोबत खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान त्याने ही घोषणा केली आहे.

मोईन अलीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने एकदा नव्हे तर दोनदा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण तो पांढऱ्या चेंडूचे क्रिकेट खेळत होता. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघातून वगळल्यानंतर मोईनने मोठा निर्णय घेत निवृत्ती जाहीर केली. नासिर हुसेनशी बोलताना मोईनने सांगितले की आता त्याच्या संघाला पुढे जाण्याची गरज आहे म्हणून निवृत्ती घेत आहे.

(हेही वाचा – Ind vs Ban Test Series : भारतीय संघात ‘या’ दोन युवा तेज गोलंदाजांना संधी)

मोईन (Moeen Ali Retired) त्याच्या निवृत्तीबद्दल म्हणाला, “मी काही दिवस राहून पुन्हा इंग्लंडसाठी खेळण्याचा प्रयत्न करू शकेन, पण मला माहीत आहे की मी असे करणार नाही. मला अजूनही वाटते की मी खेळू शकतो, परंतु मला परिस्थितीचं भान आहे आणि इंग्लिश संघाला आता नवीन खेळाडू घडवण्याची गरज आहे.

मोईन अलीने इंग्लंडसाठी ६८ कसोटी, १३८ एकदिवसीय आणि ९२ टी २० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये कसोटी सामन्यांमध्ये मोईनने गोलंदाजी करताना २०४ बळी घेतले आहेत आणि फलंदाजी करताना ३,०९४ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्याने फलंदाजी करताना २,३५५ धावा आणि गोलंदाजी करताना १११ बळी घेतले आहेत. याशिवाय मोईनने टी२० मध्ये १,२२९ धावा आणि ५१ बळी टिपले आहेत.

(हेही वाचा – Duleep Trophy 2024 : ‘या’ खेळाडूंनी गाजवली दुलिप करंडकाची पहिली फेरी)

२०१४ मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मोईन अलीने (Moeen Ali Retired) तीनही प्रकारात एकूण २९८ सामने खेळले आणि बॅटने ६,६७८ धावा केल्या, तर गोलंदाजीत ३६६ बळी मिळवले आहेत. आपल्या ऑफ स्पिनने मोईन अलीने जगभरातील फलंदाजांना अडचणीत आणले, ज्यामध्ये भारताचा महान फलंदाज विराट कोहलीचे नाव प्रामुख्याने घेतले जाऊ शकते. कोहलीने मोईनविरुद्ध खूप संघर्ष केला आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १० वेळा त्याला आऊट केले आहे. यात ६ वेळा त्याने विराटला कसोटींत बाद केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.