Mohammad Shami : मोहम्मद शमी विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही

31
Mohammad Shami : मोहम्मद शमी विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही
Mohammad Shami : मोहम्मद शमी विजय हजारेच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाही
  • ऋजुता लुकतुके

पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेला भारताचा तेज गोलंदाज मोहम्मद शमी विजय हजारे चषकाच्या पहिल्या सामन्यात खेळणार नाहीए. बंगालकडून त्याची संघात तर निवड झाली आहे. पण, पहिला दिल्ली बरोबरचा सामना तो मुकणार आहे. सातत्याने गोलंदाजी केल्यावर त्याच्या गुडघ्याला सूज येत आहे. आणि त्यामुळेच त्याने विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. (Mohammad Shami)

(हेही वाचा- Ashwin Retires : ‘अश्विनला मालिकेच्या मध्यावर निवृत्त व्हायला दिलं नसतं,’ – कपिल देव)

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शमी भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीया सामना खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे तो खेळलेला नाही. त्याने दुखऱ्या घोट्यावर परदेशात शस्त्रक्रियाही करून घेतली. आणि त्यानंतर तंदुरुस्तीचा स्तर गाठण्यासाठी तो मेहनत घेत असतानाच त्याच्या गुडघ्याला सूज येण्याचा प्रकार वाढला आहे. पुनरागमनाची प्रक्रिया म्हणून त्याने आधी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो बंगालकडून २ रणजी सामने आणि ७ टी-२० सामने आतापर्यंत खेळला आहे. यात त्याने चेंडू आणि बॅटनेही चांगली कामगिरी केली आहे. (Mohammad Shami)

पण, गुडघ्याला सूज येत असल्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच्या भारतीय संघातील पुनरागमनाला खिळ बसली आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. आणि तिथे गोलंदाजीचा भार एकटा जसप्रीत बुमरा उचलताना दिसत आहे. अशावेळी शमीला ऑस्ट्रेलियात कधी पाठवणार हा प्रश्न रोहीतला अनेकदा विचारला गेला. ब्रिस्बेनमध्ये अलीकडेच रोहीतने यावर भाष्य केलं. तो म्हणाला, ‘शमी संघात कधी परतणार, हे उत्तर आता खरंतर क्रिकेट अकादमीनेच द्यावं. त्यांच्या निगराणीखाली शमी सराव करत आहे. तिथले फिजीओ २४ तास त्याच्याबरोबर आहेत. आणि सातत्याने गोलंदाजी केल्यावर त्याच्या गुडघ्यांना सूज येते, इतकंच मला ठाऊक आहे.’ (Mohammad Shami)

(हेही वाचा- लाडक्या बहिणींना सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम करणार; Dr. Neelam Gorhe यांचे प्रतिपादन)

विजय हजारे चषकासाठीही शमीला विश्रांती देण्यात आल्यामुळे त्याच्याविषयी बीसीसीआयची भूमिका सावध असल्याचंच दिसतंय. बोर्डर – गावसकर चषक हातातून गेला, तरी आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांच्या दृष्टीनेही शमी महत्त्वाचा खेळाडू आहे. चॅम्पियन्स करंडकासह अनेक महत्त्वाच्या मालिका पुढील वर्षी होणार आहेत. (Mohammad Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.