या स्पर्धेतील पहिले चार सामने शामी खेळला नव्हता. पण, संधी मिळाल्यावर दोन सामन्यांमध्ये त्याने ५ बळी टिपले आहेत. आणि त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सगळ्यात यशस्वी भारतीय गोलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला आहे. (ICC World Cup Cricket Ind vs SL )
श्रीलंकेने डावाच्या १७ व्या षटकात शामीने कसून रंजिथाचा बळी टिपला आणि इतर भारतीय खेळाडू त्याला शुभेच्छा देण्यासाठी भोवती जमले. कुणातरी तो चेंडू शामीच्या हातात आणून दिला. आणि शामीने आनंद आणि अभिमानाने तो उंचावून प्रेक्षकांना दाखवला. कारण, या डावातील त्याचा हा पाचवा बळी होता.यंदाच्या विश्वचषकात पहिले चार सामने अकरा जणांच्या अंतिम संघात शामीला स्थान मिळालं नव्हतं. अष्टपैलू हार्दिक पांड्या जास्त उपयुक्त वाटत होता. पण, एकदा संधी मिळाल्यावर शामीने दोन सामन्यांत पाच बळी टिपले आहेत. आणि त्याचबरोबर विश्वचषक स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. (ICC World Cup Cricket Ind vs SL )
(हेही वाचा : Jasprit Bumrah : श्रीलंकेविरुद्ध जसप्रीत बुमराहच्या नावावरही लागला ‘हा’ विक्रम)
https://www.instagram.com/cricketworldcup/?utm_source=ig_embed&ig_rid=87709636-56e0-4340-8995-539555a8ec1b
या स्पर्धेत ३ सामन्यांत त्याने १४ बळी टिपले आहेत. आणि तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये मिळून त्याने ४५ बळी मिळवलेत. ही कामगिरी करताना आता त्याने जवागल श्रीनाथ आणि झहीर खानला मागे टाकलं आहे. या दोघांच्या नावावर ४४ विश्वचषक बळी होते. शामीने ४५ बळींचा पल्ला १४ सामन्यांमध्येच पूर्ण केला आहे. तर श्रीनाथने यासाठी ३४ आणि झहीरने २३ सामने खेळले होते. या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात शामीने न्यूझीलंड विरुद्ध ५४ धावांमध्ये ५ बळी मिळवले होते. सामनावीराचा पुरस्कारही त्याने मिळवला. तर पुढील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही त्याने ४ गडी बाद केले होते. आता पुन्हा एकदा श्रीलंके विरुद्ध हवेत चेंडू स्विंग करत पहिल्या षटकापासून त्याने दबदबा निर्माण केला. १८ धावांतच शामीने ५ लंकन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने लंकेवर ३०२ धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने गुणतालिकेतही प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विक्रमाबरोबरच शामीने विश्वचषक स्पर्धेत पाच बळी टिपण्याची कामगिरी एकूण ३ वेळा करत मिशेल स्टार्कच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community