Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामी पुनरागमनासाठी सज्ज

Mohammed Shami : एका वर्षाच्या विश्रांतीनंतर मोहम्मद शामी स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार झाला आहे 

37
Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामी पुनरागमनासाठी सज्ज
Mohammed Shami : अखेर मोहम्मद शामी पुनरागमनासाठी सज्ज
  • ऋजुता लुकतुके

भारताचा अनुभवी तेज गोलंदाज मोहम्मद शामी एका वर्षानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. बुघवारपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात बंगाल संघाकडून खेळणार आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने शामीला हा सामना खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. खरंतर आधीचा रणजी सामना तो खेळणार होता. पण, दुखापतींच्या भीतीमुळे शामीचं पुनरागमन लांबलं होतं. (Mohammed Shami)

(हेही वाचा- बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मुंबईबाहेर काढणार; Amit Shah यांचा घणाघात)

‘भारतीय क्रिकेटसाठी आणि बंगाल रणजी संघासाठीही अत्यंत चांगली बातमी म्हणजे मोहम्मद शामी आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला आहे. एका वर्षाच्या विश्रांतीनंतर बंगालकडून मध्यप्रदेश विरुद्घच्या सामन्यात तो खेळणार आहे,’ बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव नरेश ओझा यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. (Mohammed Shami)

 मोहम्मद शामीचं पुनरागमन ही फक्त बंगाल संघासाठीच नाही तर भारतीय संघासाठीही अत्यंत आनंदाची बातमी आहे. एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर एक वर्ष तो क्रिकेटपासून लांब आहे.आधी त्याच्या घोट्याची दुखापत विश्रांतीने बरी होईल असं वाटलं होतं. पण, ती बरी न झाल्यामुळे एप्रिल महिन्यात त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. त्यानंतर तो बंगळुरूत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. मध्ये दोनदा तो बंगालसाठी खेळू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, गोलंदाजी करताना त्याच्या गुडघ्याला सूज येत होती. आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त व्हायला वेळ लागला. (Mohammed Shami)

(हेही वाचा- Crime News: निवडणूक पथकाचे अधिकारी असल्याचे भासवत 5 भामट्यांनी व्यापाऱ्याला घातला 25 लाखांचा गंडा)

पण, आता क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्तीचं प्रमाणपत्र दिलं आहे. यानंतर मोहम्मद शामीचा मैदानावरील वावर लक्षपूर्वक पाहिला जाईल. आणि गरज पडल्यास बोर्डर – गावसकर चषकातही त्याला खेळता येईल. (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.