- ऋजुता लुकतुके
दुखापतीतून सावरल्यानंतर भारताचा स्टार तेज गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याने नेट्समध्ये सराव सुरू केला आहे. त्याचा एक फोटो त्याने अलीकडेच सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्याने लिहिलेला संदेश त्याची सकारात्मकता व्यक्त करणारा आहे. ‘हातात चेंडू व मनात ध्यास, मी बाजी पलटवायला सज्ज आहे,’ असं त्याने लिहिलं आहे.
(हेही वाचा- DCM Ajit Pawar : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय)
नोव्हेंबरपासून शमी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. एकदिवसीय विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा सामना होता. (Mohammed Shami)
Ball in hand and obsession in my heart, ready to turn the game.#shami #mdshami #mdshami11 pic.twitter.com/4nJEnbhhIl
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) July 23, 2024
या स्पर्धेत ४ बळींसह तो सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरला. भारतीय संघाला अंतिम फेरीत नेण्यातही त्याची भूमिका महत्त्वाची होती. पण, तेव्हाही तो वेदनाशामक गोळ्या घेऊन खेळत होता हे नंतर स्पष्ट झालं. तो घोट्याच्या दुखापतीने बेजार होता. आधी त्याची दुखापत विश्रांतीने बरी होईल, असं डॉक्टरना वाटलं. पण, नंतर त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड इथं तो शस्त्रक्रिया करून आला. पुढील आयपीएल स्पर्धा आणि टी-२० विश्वचषक तो अर्थातच खेळू शकला नाही. (Mohammed Shami)
(हेही वाचा- Water Supply : मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, सोमवार २९ जुलै २०२४ पासून अंमलबजावणी)
आताही तो नुकताच मैदानावर परतलाय. सरावानंतर तंदुरुस्ती परत मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. मध्यंतरी भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांनी नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना शमीबरोबर त्याच्या पुढील कारकीर्दीविषयी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. ‘त्याचं वय आणि दुखापतींचा ससेमीरा पाहता, निव़डक स्पर्धांमध्ये त्याला खेळवणं योग्य ठरेल. शमीला काय वाटतं हे ही एकदा संघ प्रशासनाने जाणून घ्यावं,’ असं म्हांब्रे तेव्हा म्हणाले होते. (Mohammed Shami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community