Mohammed Shami : मोहम्मद शमीने रोजा न ठेवल्याबद्दल होतेय टीका; माधवी लतांनी मौलानाला झापले

शमीच्या कुटुंबानेही केली रोजा न ठेवण्याच्या निर्णयाची पाठराखण.

85
Mohammed Shami : मोहम्मद शमीने रोजा न ठेवल्याबद्दल होतेय टीका; माधवी लतांनी मौलानाला झापले
Mohammed Shami : मोहम्मद शमीने रोजा न ठेवल्याबद्दल होतेय टीका; माधवी लतांनी मौलानाला झापले
  • ऋजुता लुकतुके

भारताचा सुप्रसिद्ध तेज गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या भारताकडून चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) खेळत आहे. आणि त्यात ४ सामन्यांत त्याने सर्वाधिक ८ बळीही मिळवले आहेत. पण, मुस्लीम बांधवांसाठी पवित्र रमाजान महिना सुरू असूनही शमी रोजा पाळत नसल्यामुळे एक नवीन वाद सुरू झाला आहे. शमी मैदानातच इतर खेळाडूंबरोबर जलपान करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. आणि ते पाहूनच ऑल इंडिया मुस्लीम जामातचे अध्यक्ष मौलाना शहाबुद्दिन रझवी बरेलवी (Shahabuddin Razvi) यांनी शमीवर (Mohammed Shami) टीका केली आहे. रोजा न पाळणे हे पाप आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यावर भाजपा नेत्या माधवी लता यांनी मौलाना बरेलवी यांच्यावर टीका केली आहे.

भाजपा नेत्या माधवी लता (Maadhavi Latha) म्हणाल्या की, मोहम्मद शमी (Mohammed Shami) आपल्या देशासाठी खेळतोय याचा अल्लाहला आनंद होणार नाही का?”, असा सवाल माधवी लता यांनी केला आहे. तसेच भारतासाठी खेळणे हे शमीचे कर्तव्य आहे आणि त्यावर मौलानाचा कोणताही आक्षेप नसावा. मोहम्मद शमी (Mohammed Shami) आपल्या देशासाठी खेळतोय याचा अल्लाहला आनंद होणार नाही का? वास्तविक रमजानच्या काळात मनोरंजनापासून दूर राहण्यास सांगितले जाते मग रमजानमध्ये मौलाना स्वतः क्रिकेट का पाहत होते?, असा समाचारही माधवी लता यांनी घेतला आहे.

(हेही वाचा – Bharat Ratna : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी)

मुळात ‘शरियत कायद्यानुसार, शमी (Mohammed Shami) गुन्हेगार आहे. त्याला अल्लाहला उत्तर द्यावं लागेल. रोजा पाळणं हे सुदृढ मुस्लीम व्यक्तीसाठी परम कर्तव्य आहे. भारताचा एक स्टार गोलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्घच्या सामन्यात एनर्जी ड्रिंक पिताना आम्हाला दिसला. तो खेळत होता, म्हणजे तो तंदुरुस्त होता. असं असताना त्याने रोजा पाळला नसेल, तर तो मोठा गुन्हेगार आहे,’ असं मौलवींनी म्हटलं होतं.

मौलवींनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना हे वक्तव्य केल्यामुळे ते सगळीकडे पसरलं. आणि त्यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली. पण, शमीची एक बहीण मुमताझने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलतानाच या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘तो देशाची सेवा करतो आहे. पाकिस्तानी खेळाडूही ही स्पर्धा खेळत आहेत. पण, त्यांनीही रमादानच्या महिन्यात रोजा पाळला नाही. तुम्ही देशासाठी मोठं काम करत असाल तर रोजा न पाळलेला चालतो. आम्ही शमीला (Mohammed Shami) अशा टिकेकडे लक्ष न देता, ९ तारखेच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देणार आहोत,’ असं मुमताझ म्हणाली.

(हेही वाचा – Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती)

शमीला मुस्लीम समाजाकडूनही पाठिंबा मिळत आहे. शिया समाजाचे एक मौलवी यासूब अब्बास यांनी कुराणाचा दाखला देताना प्रवास आणि आजारी असताना रोजा ठेवला नाही तर चालतो, असं म्हटलं आहे. शमी (Mohammed Shami) सध्या घरापासून दूर दुबईत असल्यामुळे त्याने राज न ठेवणं हे पाप नाही, असं अब्बास यांनी म्हटलं आहे.

शमीने (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या सामन्यात ४८ धावांत ३ बळी घेण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्याने मोक्याच्या जागी ३ बळी मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ ३०० पार जाऊ शकला नाही. रमाजान हा मुस्लीम दैनंदिनीतील नववा महिना आहे. हा महिना सर्वात पवित्र मानला जातो. मुस्लीम स्त्री व पुरुष या महिन्यात सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत उपवास धरतात आणि पाणीही ग्रहण करत नाहीत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.