Mohammed Shami : आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी मोहम्मद शामीला नामांकन

एकदिवसीय विश्वचषक गाजवलेले मोहम्मद शामी, ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील एकजण होईल आयसीसीचा नोव्हेंबरमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू. 

209
Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया 
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषक गाजवलेले मोहम्मद शामी (Mohammed Shami), ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील एकजण होईल आयसीसीचा नोव्हेंबरमधील सर्वोत्तम क्रिकेटपटू.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात झालेला एकदिवसीय विश्वचषक मोहम्मद शामीने गाजवला. फक्त भारताचाच नाही तर तो अख्ख्या स्पर्धेतील यशस्वी गोलंदाज ठरला. आता आयसीसीच्या नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठीही त्याला नामांकन मिळालं आहे. (Mohammed Shami)

त्याची स्पर्धा आहे ती ऑस्ट्रेलियाकडून अफगाणिस्तानविरुद्ध १२३ चेंडूंत २०१ धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल आणि अंतिम फेरीत भारताविरुद्ध तडाखेबाज शतक झळकावणारा ट्रेव्हिस हेड. मोहम्मद शामीने (Mohammed Shami) संपूर्ण स्पर्धेत २४ बळी टिपले. यातील १६ नोव्हेंबर महिन्यातील आहेत. त्याची सरासरी १२ धावांची होती. तर षटकामागे त्याने ५.६ धावा दिल्या आहेत. (Mohammed Shami)

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतग्रस्त झाल्यानंतर शामीला (Mohammed Shami) खेळण्याची संधी मिळाली. पण, नोव्हेंबर महिन्यात त्याने धमाल उडवून दिली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १८ धावा देत ५ बळी टिपले आणि तो पहिल्यांदा सामनावीरही ठरला. नंतर त्याच मैदानावर उपांत्य सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध तर त्याने ५७ धावांत ७ बळी टिपले आणि भारताला अंतिम फेरीत स्थानही मिळवून दिलं. (Mohammed Shami)

(हेही वाचा – Indian Navy Officers: कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावलेल्या ८ भारतीयांना मिळणार मदत)

तर ग्लेन मॅक्सवेलने या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी साकारताना अफगाणिस्तान विरुद्ध २०१ धावा केल्या होत्या. २९२ धावांचा पाठलाग करताना आणि संघाची अवस्था ७ गडी बाद ९१ झाली असताना स्वत:चा पाय दुखावला असताना मॅक्सवेलने २०१ धावा करून ऑस्ट्रेलियाला बाद फेरीत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. (Mohammed Shami)

स्पर्धेताली वेगवान शतकही त्याचंच आहे आणि त्यानंतर झालेल्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याने ४८ चेंडूंत शतक साकारलं होतं. या कामगिरीमुळे ग्लेन मॅक्सवेलचं पारडंही जड आहे. तर ट्रेव्हिस हेडला विश्वचषक स्पर्धेत उशिरा फॉर्म गवसला. पण, अंतिम फेरीत शतक झळकावून त्याने ऑस्ट्रेलियन विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (Mohammed Shami)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.