-
ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यानचा मालिकेतील दुसरा टी-२० सामना शनिवारी चेन्नईच्या पी चिदंबरम मैदानावर होत आहे. आणि या सामन्यापूर्वीही चर्चा असेल ती मोहम्मद शमीच्या समावेशाची. म्हणजे तो हा सामना खेळणार की नाही? कोलकात्यातील पहिल्या सामन्यापूर्वी शमी नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. पण, त्याच्या गुडघ्याला टेप गुंडाळलेली होती. आताही चेन्नईच्या उकाड्यात शमीने गोलंदाजीचे प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांच्या देखरेखीखाली जोरदार सराव केला. टेप गुंडाळलेली तशीच होती. पण, सरावात त्यामुळे कसूर झाली नाही. (Mohammed Shami)
शमीने सरावाच्या विविध टप्प्यांमध्ये भाग घेतला. सुरुवातीला त्याने मैदानाभोवती जॉगिंग केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक टी. दिलीप यांच्याबरोबर त्याने चेंडूच्या थ्रोचा सराव केला. आणि त्यानंतर त्याने गोलंदाजीच्या रन-अपवरही मेहनत घेतली. आणि सरावाच्या शेवटी त्याने आपल्या नेहमीच्या शैलीत पूर्ण रन-अप घेऊन गोलंदाजी केली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबरही त्याने काही वेळ चर्चा केली. (Mohammed Shami)
Kolkata ✈️ Chennai#TeamIndia have arrived for the 2nd #INDvENG T20I 😎
@IDFCFIRSTBank pic.twitter.com/mlSXuJeVfh— BCCI (@BCCI) January 24, 2025
नेट्समध्ये नितिश कुमार रेड्डी आणि हार्दिक पांड्याला त्याने गोलंदाजी केली. शिवाय क्षेत्ररक्षण आणि झेल पकडण्याच्या सारावातही तो पुन्हा एकदा सहभागी झाला. सरावात पूर्ण जोमाने सहभागी झालेला मोहम्मद शमी चेन्नईच्या सामन्यात खेळेल का हे आता पाहावं लागेल. कारण, कोलकात्यात भारतीय संघ अर्शदीप या एकमेव तज्ज तेज गोलंदाजाला घेऊन खेळला. बाकी हार्दिक आणि नितिश हे दोघं अष्टपैलू खेळाडू होते. तर रवी बिश्नोई, अक्षर, वरुण चक्रवर्ती असे तीन फिरकीपटू भारताने खेळवले. चेन्नईची खेळपट्टी पारंपरिकरित्या फिरकीलाच साथ देणारी आहे. त्यामुळे इथंही तीन फिरकीपटू खेळतील अशीच शक्यता आहे. (Mohammed Shami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community