-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत गोलंदाजीचा सगळा भार एकट्या जसप्रीत बुमराहवर पडला. त्यामुळे चाहते हा प्रश्न वारंवार विचारत होते की, मोहम्मद शमी कधी संघात परतणार. त्याविषयी अजून अनिश्चितता असली तरी एका ताज्या व्हीडिओमुळे शमीची तयारी जोरदार सुरू असल्याचंच दिसत आहे. खुद्द शमीने हा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि २७ सेकंदांच्या या व्हीडिओमध्ये शामी अचूक आणि वेगवान चेंडू टाकताना दिसत आहे. (Mohammed Shami)
(हेही वाचा- Mahakumbh 2025 साठी पोलिसांचे सायबर पेट्रोलिंग सुरू; 78 संशयास्पद वेबसाइट आणि 4 जणांना अटक)
भारतीय संघ आता १५ दिवसांत इंग्लंडबरोबर टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर महत्त्वाची चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही तोंडावर आहे. आणि अशावेळी शमीची संघाला गरज आहे. शमीही त्याचसाठी तयारी करताना दिसत आहे. या व्हीडिओला शमीने मथळा दिला आहे, ‘अचूकता, वेग आणि समर्पण! जगाला अंगावर घेण्यासाठी मी तयार आहे!!’ (Mohammed Shami)
Precision, Pace, and Passion, All Set to Take on the World! 🌍💪 #Shami #TeamIndia pic.twitter.com/gIEfJidChX
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) January 7, 2025
२०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघासाठी तो शेवटचा खेळला होता. एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला घोट्याच्या दुखापतीने सतावलं आहे. लंडनला जाऊन तो शस्त्रक्रिया करूनही आला. आणि त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेट खेळून आपली तंदुरुस्ती आजमावत आहे. बंगालकडून तो २ रणजी सामने खेळला आहे. तर विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली या एकदिवसीय आणि टी-२० स्पर्धाही तो खेळला. (Mohammed Shami)
(हेही वाचा- HMPV Virus बद्दल अफवा पसरवू नका! तज्ज्ञांचे आवाहन)
पण, अलीकडे बीसीसीआयनेच स्पष्ट केल्याप्रमाणे, गोलंदाजी केल्यावर त्याच्या गुडघ्याला अनजू सूज येत आहे. त्यामुळे भारतीय संघातील त्याचा समावेश अजूनही अनिश्चितच आहे. बीसीसीआयने अनेकदा शमीविषयी नीट माहिती द्यायचं टाळलं आहे. बीसीसीआयकडून एक फिजीओ त्याच्याबरोबर नियमितपणे असतात. आणि त्याच्या तंदुरुस्तीवर ते लक्ष ठेवून आहेत, एवढंच सध्या बीसीसीआयने सांगितलं आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी करणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. (Mohammed Shami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community