Mohammed Shami : नवीन दुखापतीमुळे मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं 

Mohammed Shami : बोर्डर - गावसकर मालिकेत तो खेळण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळली आहे 

40
Mohammed Shami : नवीन दुखापतीमुळे मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं 
Mohammed Shami : नवीन दुखापतीमुळे मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं 
  • ऋजुता लुकतुके

मोहम्मद शमीला झालेल्या नवीन दुखापतीमुळे आता मोहम्मद शमीचं पुनरागमन लांबलं आहे. मीडियात पसरलेल्या एका बातमीनुसार, घोट्याच्या दुखापतीबरोबरच शामीचा कमरेचा स्नायूही आता दुखावला आहे. शिवाय त्याच्या गुडघ्यालाही अलीकडे सूज येत होती. त्यामुळे शामी बोर्डर – गावसकर चषकात खेळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात तसाही त्याचा समावेश नाही. तसंच बंगालच्या रणजी संघातही अलीकडे शामीचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे नेमकं शामीला काय झालंय अशी चर्चा सुरू झाली होती.  (Mohammed Shami)

(हेही वाचा- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत Donald Trump आघाडीवर)

गेल्या महिन्यात शमी गुरगावमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. तिथे बोलताना त्याने दुखापत बरी झाल्याचा निर्वाळा दिला होता. ‘मी अजून पूर्ण रनअपने धावत नाहीए. तो मी निम्म्यावर आणलाय. कारण, शरीराला जास्त त्रास द्यायचा नाहीए. पण, बाकी दुखापतीतून मी सावरलोय,’ असं तेव्हा शमी म्हणाला होता. (Mohammed Shami)

इतकंच नाही तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी एखाद दुसरा रणजी सामना खेळण्याचा मानसही शमीने तेव्हा बोलून दाखवला होता. ‘माझ्याकडून कशाप्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. काय जबाबदारी माझ्यावर असणार हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मी तशी तयारी करत आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी निदान १५ दिवस तयारीला मिळावेत असा माझा प्रयत्न असेल,’ असंही शमी त्यावेळी म्हणाला होता.  (Mohammed Shami)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग होणार, शरद पवारांच्या तक्रारीची आयोगाकडून दखल)

पण, आता तो ऑस्ट्रेलियाला जाऊच शकणार नसल्याचं समोर आलं आहे. एकूणच मागच्या वर्षभरात शमीच्या तंदुरुस्तीवरून बरंच गोंधळाचं वातावरण आहे. नोव्हेंबर २०२३ पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. आधी विश्रांतीनंतर त्याची घोट्याची दुखापत बरी होईल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात येत होतं. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्याने लंडनमध्ये शस्त्रक्रिया करून घेतली. तेव्हापासून तो बंगळुरूच्या क्रिकेट अकादमीत दुखऱ्या पायावर उपचार घेत आहे. पण, नेट्समधील गोलंदाजीच्या पलीकडे त्याची मजल गेलेली नाही. आता या नवीन दुखापतीची बातमी समोर आली आहे.  (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.