-
ऋजुता लुकतुके
जवळ जवळ दीड वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या मोहम्मद शमीने (Mohammed Shami) बांगलादेश विरुद्ध ५३ धावांत ५ बळी टिपले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० बळींचा टप्पा त्याने पूर्ण केला. ५,१२६ चेंडूंमध्येच मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) त्याने मागे टाकलं. स्टार्कने ५,२४० चेंडूंमध्ये ही कामगिरी केली होती. तर त्यापूर्वी पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने (Saqlain Mushtaq) ५,४४१ चेंडूंमध्ये २०० बळी पूर्ण केले होते.
या यादीत न्यूझीलंडचा ट्रेट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचा शेन बाँड, ब्रेट ली आणि वकार युनूस यांचीही नावं आहेत. या मालिकेत आता मोहम्मद शमी (Mohammed Shami) आघाडीवर आहे.
(हेही वाचा – Delhi Cabinet Ministers : दिल्लीतील शपथविधीनंतर 4 तासांत खातेवाटप ; कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले ते जाणून घ्या …)
एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद २०० बळी घेणारे गोलंदाज,
मोहम्मद शमी – ५,१२६
मिचेल स्टार्क – ५,२४०
सकलेन मुश्ताक – ५,४५१
ब्रेट ली – ५,६४०
ट्रेंट बोल्ट – ५,७८३
वकार युनूस – ५,८८३
शमीने भारतासाठी या सामन्यातून आणखी एक विक्रमी कामगिरी केली आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आयसीसीच्या (ICC) स्पर्धांमधून भारताकडून सर्वाधिक ७४ बळी मिळवले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीनंतर शमीने इंग्लंडविरुद्घच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पुनरागमन केलं. आणि आता बांगालदेशविरुद्ध त्याने ५ बळी मिळवले.
(हेही वाचा – Marathi Language : मायबोली मराठीची समृद्ध प्राचीन परंपरा आणि आधुनिक काळातील आव्हाने…)
He is BACK and HOW 🤩
𝗙𝗜𝗙𝗘𝗥 for Mohd. Shami against Bangladesh!
Follow the Match ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#TeamIndia | #BANvIND | #ChampionsTrophy | @MdShami11 pic.twitter.com/sX0dT9cCbp
— BCCI (@BCCI) February 20, 2025
शमीने (Mohammed Shami) एकदिवसीय विश्वचषकात १८ सामन्यांत ५५ बळी घेतले आहेत. तर ४ टी-२० सामन्यांत त्याच्या नावावर १४ बळी आहेत. आणि कसोटी अजिंक्यपदाची तो एकच कसोटी खेळला आहे. आणि यात त्याने ४ बळी टिपले आहेत. शमीने या बाबतीत झहीर खानला (Zaheer Khan) मागे टाकलं आहे. झहीरने यापूर्वी आयसीसी स्पर्घांमध्ये ७१ बळी घेतले होते.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये जलद २०० बळी घेणारे गोलंदाज,
मिचेल स्टार्क – १०२ सामने
मोहम्मद शमी – १०४ सामने
ट्रेंट बोल्ट – १०७ सामने
ब्रेट ली – ११२ सामने
ॲलन डोनाल्ड – ११७ सामने
हेही पहा –
Join Our WhatsApp Community