मोहम्मद शमीचा विक्रम, किती घेतले बळी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका अशी कसोटी मालिका सध्या सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क येथे सुरु आहे. या कसोटी सामन्यात भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करत, कसिगो रबाडला तंबूत धाडलं. ही विकेट शमीसाठी विशेष होती, कारण ही विकेट क्रिकेटमध्ये शमीचा 200 वा बळी ठरली आणि शमी कसोटी मालिकेत 200 बळी घेणारा पाचवा भारतीय ठरला.

ठरला पाचवा वेगवान गोलंदाज

कसोटी सामन्यात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी करत 5 बळी घेतले. असे करत शमी एका खास क्लबमध्ये सामील झाला. शमीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 200 बळी पूर्ण केले आहेत. मोहम्मद शमी कसोटीत 200 बळी घेणारा पाचवा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. शमीपूर्वी कपिल देव, झहीर खान, इशांत शर्मा आणि जवागल श्रीनाथ यांनी कसोटीत असे पराक्रम केले होते. शमी भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा 11वा गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले, तर कपिल देवने आपल्या कारकिर्दीत 434 विकेट्स घेतल्या आहेत, इशांत शर्माने आतापर्यंत 311 विकेट्स तर झहीर खानने कसोटी कारकिर्दीत 311 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीनाथ आपल्या कसोटी कारकिर्दीत 236 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता.

( हेही वाचा: टॅक्सीसाठी हात दाखवताय, पण ती रिकामी आहे का? आता सहज समजणार…)

दक्षिण आफ्रिकेचा डाव 197 धावांवर आटोपला

भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव 197 धावांत गुंडाळला. भारताकडून शमीने 5 आणि जसप्रीत बुमराहने 2 बळी घेतले. याशिवाय शार्दुल ठाकूरनेही २ बळी घेत आफ्रिकेच्या फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्याचवेळी सिराजच्या खात्यात 1 विकेट आली. भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here