Mohammed Shami : मोहम्मद शमीविषयी रोहितने दिला हा महत्त्वाचा अपडेट

Mohammed Shami : शमी सध्या भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे 

41
Mohammed Shami : मोहम्मद शमीविषयी रोहितने दिला हा महत्त्वाचा अपडेट
Mohammed Shami : मोहम्मद शमीविषयी रोहितने दिला हा महत्त्वाचा अपडेट
  • ऋजुता लुकतुके

ब्रिस्बेन कसोटीनंतर रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा सगळ्यांचा एक सामायिक प्रश्न होता, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात कधी येणार? मालिकेतील उर्वरित दोन कसोटी दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या आहेत. अशावेळी शमी संघात दाखल झाला तर भारतीय गोलंदाजीची ताकद नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणारा शमी ऑस्ट्रेलियात जाईल का, हा प्रश्न पत्रकारांनी रोहितलाही विचारला. त्यावर रोहितने स्पष्टच उत्तर दिलं. (Mohammed Shami)

(हेही वाचा- Ashwin Retires : अश्विनची वेळ चुकली असं गावसकरांना का वाटतं?)

‘मला वाटतं, या प्रश्नाचं उत्तर आता क्रिकेट अकादमीनेच द्यायला हवं. तिथेच तो सराव आणि दुखापतीतून सावरण्याचे व्यायाम करत आहे. तो कसोटी खेळण्याइतका तंदुरुस्त कधी होईल हे त्यांनाच माहीत आहे. तो सध्या देशांतर्गत स्पर्धा खेळतोय हे मला माहीत आहे. पण, त्याच्या गुडघ्यालाही इजा झाल्याचं मला समजलंय. कुणी घाई घाईत संघात आलं. कसोटीच्या मध्यावर दुखापतीची समस्या निर्माण झाली तर ते महागात पडले. त्यापेक्षा सावधगिरी बाळगलेली चांगली,’ असं रोहितने रोखठोकपणे सांगितलं. (Mohammed Shami)

मोहम्मद शमी नोव्हेंबर २०२३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. शस्त्रक्रियेतून सावरल्यानंतर शमी दोन रणजी करंडकातील सामने खेळला आहे. त्यानंतर ११ दिवसांत ६ टी-२० सामनेही तो खेळला. पण, त्याचवेळी गोलंदाजीच्या लयीत तो अजून पूर्णपणे आला नसल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयनेही शमीच्या बाबतीत सावध भूमिका घेतली आहे. घोट्याच्या दुखापतीतून सावरल्यावर त्याने गुडघ्याला सूज आल्याची तक्रार केली होती. (Mohammed Shami)

(हेही वाचा- Jammu and Kashmir च्या कुलगाममध्ये चकमक; ५ दहशतवादी ठार, २ जवान जखमी)

दुसरीकडे शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहवर गोलंदाजीचा सगळा भार येत आहे. त्याला दुसऱ्या बाजूने सिराज, आकाशदीप, हर्षित यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच ही मालिकाही १-१ अशी बरोबरीत आहे. आणि ती जिंकण्यासाठी गोलंदाजांनीही आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे. (Mohammed Shami)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.