-
ऋजुता लुकतुके
मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तंदुरुस्त असल्याचे संकेत त्याच्या कामगिरीने दिले आहेत. आणि सध्या सुरू असलेल्या विजय हजारे चषक स्पर्धेत पूर्ण १० षटकं टाकतानाच ३ बळीही मिळवले आहेत. हरयाणा विरुद्ध उपउपांत्य फेरीचा सामना खेळताना शामीने १० षटकांत ६१ धावा देत ३ बळी मिळवले. षटकामागे ६ च्या वर धावा दिल्या असल्या तरी शमी लयीत गोलंदाजी करत होता. आणि ही गोष्ट महत्वाची आहे. (Mohammed Shami)
(हेही वाचा- प्रथमच, CRPF मधील निवृत्त श्वान आता सामान्य नागरिकांना दत्तक घेता येणार)
शमी याआधी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत बंगालकडून पहिल्यांदा खेळला होता. यात ८ सामने तो खेळला. आणि चेंडू तसंच बॅटने त्याने आश्वासक कामगिरी केली. पण, त्यानंतर त्याच्या गुडघ्याला सूज येत असल्यामुळे विजय हजारे चषकाचे साखळी सामने तो खेळला नव्हता. पण, आता बाद फेरीत त्याने पुन्हा पुनरागमन केलं असून पहिल्याच सामन्यात चुणूक दाखवली आहे. यामुळे चॅम्पियन्स कंरडकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. (Mohammed Shami)
शमीच्या या कामगिरीनंतरही हरयाणा संघाने पहिली फलंदाजी करत सामन्यात ८ बाद २९८ धावांचा डोंगर उभा केला. आणि बंगालला २२६ धावांत गुंडाळत त्यांनी हा सामना ७२ धावांनी जिंकला. फलंदाजीत शमी चमक दाखवू शकला नाही. आणि तो दोन धावा करून बाद झाला. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करताना शमी आतापर्यंत ९ टी-२० सामने खेळला आहे. तसंच हा त्याचा तिसरा एकदिवसीय सामना होता. (Mohammed Shami)
(हेही वाचा- Mahavikas Aghadi मध्ये फाटाफूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकत्र लढणार की नाही?)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत पाहता, शमी जर संघात आला तर त्यामुळे भारतीय संघाला उभारी येणार आहे. सध्या बीसीसीआयचे एक फिजीओ सतत शामीबरोबर असतात. आणि ते शमीची तंदुरुस्ती तसंच दुखापत यांच्यावर लक्ष ठेवून असतात. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने हिरवा कंदील दिल्यावरच शमीचा भारतीय संघात निवडीसाठी विचार होऊ शकेल. पण, शमीनेच अलीकडे तो जोरदार तयारी करत असल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध करून आशा उंचावल्या आहेत. (Mohammed Shami)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community