- ऋजुता लुकतुके
मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा भारतीय क्रिकेटमधील यशस्वी तेज गोलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक बळी त्याने घेतले आहेत. सध्या दुखापतीतून नुकतेच पुनरागमन केल्यामुळे तो चर्चेत आहे. त्याच दरम्यान, त्याच्यावर वय चोरल्याचाही आरोप होत आहे. सोशल मीडियावर त्याचा जुना वाहन परवाना सध्या व्हायरल झाला आहे आणि त्यात शमीचं वय चक्क ४२ असल्याचं दिसतंय. मूळ ट्विट काही कालावधीनंतर डिलिट झालं. पण, तोपर्यंत लोकांनी त्याचा फोटो काढून तो व्हायरल करायला सुरुवात केली आहे.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याची पत्नी हसीन जहाँनेही त्याच्यावर घरगुती छळ आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले होते. चांगली गोष्ट म्हणजे बीसीसीआयने फिक्सिंग प्रकरणात शमीला खूप आधी क्लीन चिट दिली होती. आता ड्रायव्हिंग लायसन्सचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शमीचे वय ४२ वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Ind vs SA, 4th T20 : आफ्रिकेतील मालिका विजयानंतर सूर्यकुमारच्या या कृतीने झाली धोनीची आठवण )
Just found Mohammad Shami license online and it shows that he is 42 years old.@BCCI kindly investigate on this. pic.twitter.com/Cy06RjAcOG
— Mohan Krishna 🇮🇳 (@ViratKohli18630) November 15, 2024
मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) ड्रायव्हिंग लायसन्स एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे पाहता हे स्पष्ट होते की शमीचे वय ४२ वर्षे आहे तर तो स्वत: ३४ वर्षांचा असल्याची नोंद बीसीसीआयकडे आहे. वयात ८ वर्षांचा फरक आढळल्यानंतर लोक शमीला ट्रोल करत आहेत. आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे X वरची ती पोस्ट हटवण्यात आली आहे, पण इतर लोकांनी फोटो घेतला आणि परत सोशल मीडियावर शेअर केला. हा ड्रायव्हिंग लायसन्स फोटो खरा आहे की एडिट केला आहे, याबाबत अद्याप काहीही समोर आलेले नाही. हे फोटो केवळ शमीवरच नाही तर बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित करत आहे.
पण, या पोस्टची सत्यता अजून समोर आलेली नाही. हा खोडसाळपणाही असू शकतो. शमी (Mohammed Shami) किंवा बीसीसीआयने यावर अधिकृत मत अजून व्यक्त केलेलं नाही. भारतात वय लपवणे आणि फसवणूक करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. एखाद्या क्रिकेटपटूने वय लपवल्यास त्याला दंड आणि काहीवेळा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. भारतीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाल्यास, वयाची फसवणूक सहसा १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये होते, जेव्हा खेळाडू संघात निवड होण्यासाठी त्यांचे वय एक किंवा दोन वर्षे कमी करतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community