Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया 

शामी सध्या लंडनमध्ये आहे. आणि आयपीएल खेळू शकणार नाहीए. 

251
Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया 
  • ऋजुता लुकतुके

एकदिवसीय विश्वचषक गाजवलेला तेज गोलंदाज मोहम्मद शामीच्या (Mohammed Shami) दुखऱ्या पायावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या दुखापतीमुळे गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरपासून तो क्रिकेट खेळत नाहीए. आणि शस्त्रक्रियेनंतरही त्याला दीर्घ काळ सुटी घ्यावी लागणार आहे. शामीने स्वत: ट्विटरवर आपल्या शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली आहे. (Mohammed Shami Surgery)

‘ॲकिलिस टेंडन या पायांच्या स्नायूशी निगडित आजारासाठी पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. की यशस्वी झाली असली तरी यातून पूर्ण बरा व्हायला काही वेळ लागणार आहे. लवकरच आपल्या पायांवर उभा राहीन,’ असं शामीने (Mohammed Shami) या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे. (Mohammed Shami Surgery)

(हेही वाचा – Mohammed Shami Surgery : मोहम्मद शामीच्या दुखऱ्या पायवर शस्त्रक्रिया )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्या शामीला शुभेच्छा

१९ नोव्हेंबरच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्या दरम्यान शामीला (Mohammed Shami) ही दुखापत झाली. आगामी आयपीएलमध्ये तर शामी खेळू शकणार नाहीए. आणि टी-२० विश्वचषकात खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. सुरुवातीला विश्रांती आणि औषधांनी शामीची दुखापत बरी होईल असा बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाचा अंदाज होता. पण, दुखापत आणखी चिघळल्यावर त्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. (Mohammed Shami Surgery)

दरम्यान शामीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मोहम्मद शामीला (Mohammed Shami) लवकर बरा होण्यासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी शुभेच्छा. अंगभूत धैर्यामुळे तू या शस्त्रक्रियेतून सुखरुप बाहेर पडशील,’ अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदींनी शामीला दिल्या आहेत. ३३ वर्षीय शामी मागच्या दोन आयपीएलमध्येही यशस्वी ठरला होता. २०२२ च्या हंगामात २२ तर २०२३ च्या आयपीएल हंगामात त्याने २७ बळी मिळवले होते. पण, आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेमका कधी परतू शकेल यावर स्पष्टता नाही. (Mohammed Shami Surgery)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.