- ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय निवड समितीने शुक्रवारी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली. २२ नोव्हेंबरला पर्थ कसोटीपासून भारताच्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. मालिका ऑस्ट्रेलियात होणार असल्यामुळे अर्थातच संघात पाच तेज गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांच्या जोडीला प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांचीही निवड झाली आहे. तर तेज गोलंदाज आणि अष्टपैलू म्हणून नितिश रेड्डीही संघात आहे. पण, भारताचा अव्वल स्विंग गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) संघात नाही. हर्षित आणि निशित पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत.
पण, या संघात मोहम्मद शमीचं (Mohammed Shami) नाव नाही. एप्रिल महिन्यातील शस्त्रक्रियेनंतर तो बंगळुरूच्या राष्ट्रीय अकादमीत सराव करत आहे. या दौऱ्यापर्यंत तो तंदुरुस्त व्हावा अशीच अपेक्षा होती. पण, ती फोल ठरली आहे.
(हेही वाचा – Baba Siddiqi Murder प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन समोर! ड्रोनच्या सहाय्याने शस्त्र आली भारतात?)
🚨 NEWS 🚨
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
— BCCI (@BCCI) October 25, 2024
शमीला (Mohammed Shami) घोट्याच्या दुखापतीने सातवलं आहे आणि त्यावर तो कामही करत आहे. अगदी अलीकडे बंगळुरू कसोटीत दिवसभराचा खेळ झाल्यावर शमी त्याच नेट्समध्ये चांगला तासभर भारतीय संघाबरोबर सराव करताना दिसला. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी त्याच्या गुडघ्याला सूज येत असल्याची बातमी मीडियाने दिली तेव्हा शमी स्वत: ट्विटरवर येऊन ही बातमी खोटी असल्याचं म्हणाला होता. त्यामुळे निदान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो संघाबरोबर असेल असं वाटत होतं. पण, ती आशा फोल ठरली आहे.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : महापालिका शिक्षणाधिकारी निवडणूक रिंगणात; उबाठा शिवसेनेकडून ‘या’ मतदारसंघातून लढणार)
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) October 25, 2024
मोहम्मद शमी (Mohammed Shami) गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ पासून भारतीय संघात खेळलेला नाही. त्याच्या दुखापतीविषयीचा गोंधळही तेव्हापासूनचा आहे. सुरुवातीला दुखापत विश्रांतीने बरी होईल असं म्हणत त्याने रणजी हंगामातून विश्रांती घेतली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही तो गेला नाही. अखेर एप्रिलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपूर्वीही भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या गुडघ्याला गोलंदाजीनंतर सूज येत असल्याचं म्हटलं होतं. थोडक्यात, एक वर्ष दुखापतीला झालं तरी अजून मोहम्मद शमी पुरेसा तंदुरुस्त नाही असंच दिसतंय. देशांतर्गत क्रिकेटमधील सरावाशिवाय तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल अशी खात्री निवड समितीला वाटत नाहीए.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community