- ऋजुता लुकतुके
मोहम्मद शमी हा या धडीला जसप्रीत बुमराहच्या खालोखाल भारतीय ताफ्यात असलेला प्रभावी तेज गोलंदाज आहे. पण, एकदिवसीय विश्वचषकानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे तो क्रिकेट खेळू शकलेला नाही. एक वर्षानंतर आता त्याने रणजी आणि सय्यद अली चषक स्पर्धेतून मैदानी क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. मधल्या काळात आयपीएलचा लिलाव पार पडला आणि शमीचा आधीचा संघ गुजरात टायटन्सने त्याला आपल्याकडे कायम न ठेवता मुक्त केलं. नंतर लिलावातही त्याच्यासाठी राईट-टू-मॅच कार्ड वापरलं नाही. शमीला कायम का ठेवलं नाही याचं उत्तर आता गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी दिलं आहे.
आशिष स्वत: तेज गोलंदाज आहे आणि यंदा आयपीएल लिलावात तेज गोलंदाजांवरच उड्या पडल्या. पण, शमीची किंमत गुजरातला परवडणारी नव्हती असं आशिष अप्रत्यक्षपणे बोलून गेला आहे.
(हेही वाचा – “तुम्ही आता फक्त घोषणा देण्याचं काम करा”, Sanajy shirsat यांचा राऊतांना टोला)
“Shami’s contribution to #GT over the past 3 years has been truly remarkable,” says Nehra 🗣️#JioCinemaSports #IPLAuctiononJioStar #TATAIPL #MohammedShami pic.twitter.com/mODTYJq3gp
— JioCinema (@JioCinema) November 26, 2024
‘आम्हाला अर्थातच शमीला कायम ठेवायचं होतं. त्याचं गुजरात संघ आणि भारतासाठीही योगदान खूप मोठं आहे. पण, ६ खेळाडू कायम ठेवता येणार होते. त्यासाठी भली मोठ्ठी किंमत मोजावी लागणार होती. शुभमन, सुदर्शन, रशिद यांना कायम ठेवायचं होतं. आम्ही राईट-टू-मॅच कार्ड वापरण्याचा विचार नक्कीच केला होता. पण, किंमत वर चढत गेली आणि ते शक्य झालं नाही,’ असं आशिष नेहराने या व्हिडिओत म्हटलं आहे.
लिलावापूर्वी गुजरात टायटन्सने ५ खेळाडूंना कायम राखलं होतं. यात शुभमन गिल (१६.५ कोटी), रशिद खान (१८ कोटी), राहुल टेवाटिया (४ कोटी), शाहरुख खान (४ कोटी) आणि साई सुदर्शन (८.५ कोटी) या खेळाडूंचा समावेश आहे. इतक्या खेळाडूंसाठी आधीच पैसे मोजलेले असताना मोहम्मद शमीसाठी त्यांच्याकडे पैसे उरले नाहीत. आपण कितीही रणनीती आखली तरी ती दरवेळी यशस्वी होतेच असं नाही, असं आशिष नेहरा यांनी म्हटलं.
(हेही वाचा – ICC Champions Trophy 2025 : आयसीसी २९ नोव्हेंबरच्या बैठकीत चॅम्पियन्स करंडकावर निर्णय घेण्याची शक्यता)
मोहम्मद शमीला गुजरात टायटन्सनी २०२२ साली ६ कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. तो गुजरात फ्रँचाईजीचा पदार्पणाचा हंगाम होता आणि पदार्पणातच गुजरात टायटन्सनी लीगमध्ये बाजी मारली होती. तर २०२३ च्या हंगामात शमीने पर्पल कॅप पटकावली होती. यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community